मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकणारच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


नवी मुंबई : स्व.अण्णासाहेब पाटील यांना अभिवादन करताना ना. देवेंद्र फडणवीस, समवेत ना. बाळासाहेब पाटील,आ. गणेश नाईक, ना. नरेंद्र पाटील, आ. शशिकांत शिंदे व अन्य मान्यवर 


स्व. अण्णासाहेब पाटील यांना अभिवादन. 


नवी मुंबई / प्रतिनिधी


 बाळासाहेब ठाकरे आणि अण्णासाहेब पाटील यांच्या स्वप्नातील सशक्त व समर्थ महाराष्ट्र साकारण्यासाठी आपण सर्वानी मिळून प्रयत्न करूया, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केले. मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई सुध्दा जिंकणारच असा विश्वासही  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.


          माथाडी कामगारांचे आराध्यदैवत स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार युनियन, माथाडी कामगार सहकारी पतपेढी, माथाडी कामगार सहकारी ग्राहक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने 'माथाडी भवन'नवी मुंबई येथे आयोजित केलेल्या ऑनलाइन मेळाव्यात ते बोलत  होते.


      ते पुढे असे म्हणाले की माथाडींच्या सर्व समस्यांची मुख्यमंत्री म्हणून मी सोडवणूक करणार आहेच,त्याबरोबरच मराठा आरक्षण हि न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी सरकारचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत आणि हि लढाई आम्ही जिंकणारच. असा विश्वासही व्यक्त केला. 


सरकारद्वारे 'माझे कुटुंब माझी जबादारी" हि योजना जाहीर केलेली आहे. ती साकार करण्याची जबाबदारी सर्वांनी स्वीकारली पाहिजे. कोरोनाला हरवण्यासाठी या उपक्रमात सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले


      यावेळी राज्याचे सहकार व पणन मंत्री ना.बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस माजी मंत्री आमदार गणेश नाईक, माजी मंत्री व विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे, ना. नरेंद्र पाटील, युनियनचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप यांच्यासह मान्यवर या समारंभासाठी उपस्थित होते.


 यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले मराठा आरक्षणाची लढाई आपण जिंकू व तीच खरी स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांना अर्पण केलेली खरी आदरांजली  ठरेल. 


यावेळी आमदार नरेंद्र पाटील बोलताना म्हणाले सरकारने बाजार समित्या नियमन मुक्त करण्याचा आदेश काढला पण अजुनही शेतकऱ्यांना न्याय कसा मिळत नाही? असा प्रश्न उपस्थित केला. 


यावेळी सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील आमदार गणेश नाईक, आमदार शशिकांत शिंदे, युनियन चे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. 


या मेळाव्यात ८ माथाडी कामगारांना माथाडी भूषण पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.


         यावेळी आ. प्रसाद लाड,अशोक गावडे, बाजार समितीचे सभापती अशोक डक, उपसभापती धनंजय वाडकर, सचिव अनिल चव्हाण, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे एमडी अनिल पाटील, माथाडी पतपेढीचे व्यवस्थापकीय संचालक रमेश पाटील, माथाडी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.हणमंतराव पाटील, माथाडी युनियनचे संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, ऋषिकांत शिंदे, रविकांत पाटील,कायदेशीर सल्लागार सौ. भारतीताई पाटील आदी उपस्थित होते.


------------------------------------------


कोरोना काळात माथाडी कामगार हॉस्पिटलने रुग्णांना अहोरात्र आरोग्य सेवा दिली. आजही रुग्ण सेवा अहोरात्र सुरू आहे. अशा माथाडी कामगार हॉस्पिटलला शासनाकडून मुख्यमंत्री निधीतून 10 कोटी रूपये अर्थसहाय्य मिळावे.


  कोरोना काळात माथाडी कामगारांनी आपल्या जिवाची पर्वा न करता आपले काम चालू ठेवून एक प्रकारे समाजसेवाच केली आहे. माझे माथाडी कामगार कोरोना योद्धेच आहेत. त्यामुळे या माथाडी कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून त्यांना 50 लाखाचे विमा संरक्षण शासना कडून मिळावे. अशी माझी या मेळाव्याच्या निमित्ताने शासनाकडे प्रमुख मागणी आहे.                


                       ना.नरेंद्र पाटील


               अध्यक्ष आण्णासाहेब पाटील


          आर्थिक मागास विकास महामंडळ. 


-------------------------------------------