ग्राहकांना चांगली सेवा द्यायचे जमत नसेल तर, तुमचा टॉवर काढून न्या बनपुरी ग्रामपंचायतीचा व्होडाफोन कंपनीला आदेश.


सणबूर/प्रतिनिधी (प्रमोद पाटील याजकडून ) 


बनपुरी परिसरात मोबाईलचे नेटवर्क गायब असून व्होडाफोन कंपनीचा टॉवर असून अडचण नसून खोळंबना झाली आहे त्यामुळे परिसरातील मोबाईल धारकांना रेंज मिळवण्यासाठी झाडांचा किंवा घरांच्या छतावर जावे लागत आहे एकतर ग्राहकांना सेवा द्या नाहीतर व्होडाफोन कंपनीने त्यांचा टॉवर काढून  टाकावा असे कंपनी च्या प्रशासनाला ग्रामपंचायतीने लेखी कळवले आहे 


      सध्या कोरोना मुळे शाळा,महाविद्यालय बंद आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचा ऑनलाईन आभ्यास  चालू आहे. काही पालकांनी आपल्या मुलांना शाळेच्या अभ्यासासाठी पोटाला चिमटा काढून  मोबाईल फोन घेतले आहेत आणि रिचार्ज सुद्धा तीन महिन्याचे मारले आहेत पण मोबाईलचे नेटवर्क मिळत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांची आभ्यासाची मोठी गैरसोय होत असून ग्राहकांची मात्र मोठ्या प्रमाणात लुट केली जात आहे


         याबाबत बनपुरी गावचे उपसरपंच शिवाजीराव पवार म्हणाले की बनपुरी परिसरात जवळपास दोन हजार ते तीन हजार व्होडाफोन चे ग्राहक आहेत, आम्ही गेल्या चार पाच महिने पासून व्होडाफोन कंपनीला ग्राहकांना रेंज मिळत नाही याबद्दल सातत्याने तक्रार केली आहे परंतु त्यासाठी कंपनीने ग्राहकांना रेंज मिळावी म्हणून कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली गेली नाही. सतत चाल ढकल केली जात आहे म्हणून आता कंपनीला शेवटचा निर्वणीचा ईशारा दिला असून एकतर ग्राहकांना चांगली सेवा द्या नाहीतर तुमचा टॉवर बनपुरी गावातून काढून  द्यावा असे कंपनीला कळवले आहे. 


 


Popular posts
पृथ्वीराज चव्हाण यांना भाजपविरुद्ध लढण्यासाठी दिल्लीतून दिली मोठी जबाबदारी.
इमेज
शेंडेवाडी येथील दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह. जनतेने काळजी घेण्याचे डॉक्टरांचे आवाहन.
इमेज
कोरोना संक्रमिक रुग्ण संख्येवर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी यांचे खाजगी डॉक्टर्स आणि हॉस्पिटलला आदेश
इमेज
सातारा जिल्ह्यात 195 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित तर 2 बाधिताचा मृत्यु
इमेज
सातारा जिल्ह्यात 182 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु
इमेज