माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा मालदन गावात शुभारंभ.


कोरोना योद्धे जबाबदारी ची शपथ घेताना. (छाया:अनिल देसाई ) 


माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा मालदन गावात शुभारंभ.


कुंभारगांव / प्रतिनिधी :


राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्यासाठी त्यांनी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिम राबवण्याबाबत राज्यभर सुचना केल्या. १५ सप्टेंबरपासून १० ऑक्टोबरपर्यंत ही मोहिम राबवली जात आहे. 


या मोहिमेची मालदन (ता.पाटण) येेथे  सुरुवात करण्यात आली "माझं कुटुंब माझी जबाबदारी" या मोहीमेचा शुभारंभ पाटण पंचायत समितीचे उपसभापती प्रतापभाऊ देसाई यांचे हस्ते करण्यात आला. 


यावेळी ग्रामसेवक अनिल जाधव, प्राथमिक आरोग्य केंद्र सणबूरचे सहायक सेवक के सी तडवी,सरपंच भीमराव गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य आबासो काळे, बाळासो सपकाळ, राहुल साळुंखे, उदय काळे, पोलीस पाटील विकास माने यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी सर्वाना जबाबदारीची शपथ देण्यात आली. 


यावेळी आरोग्य सेवक एस बी गवई, आशा वर्कर दीपाली पन्हाळे, अंगणवाडी सेविका, माधुरी कदम, अश्विनी काळे, विद्या काळे, लीलावती काळे, जयश्री चोपदार, उषा गायकवाड. तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. 


या मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित कोरोना योद्धे, कोरोना कमिटी व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना पाटण पंचायात समिती उपसभापती प्रतापभाऊ देसाई म्हणाले लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांनी घराबाहेर पडणे टाळावे.


दोन नागरिकांनी एकमेकांमध्ये किमान सहा फुटांचे अंतर राखावे. 


सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही वस्तूला अथवा भिंत, रेलिंग, कठडा, जिना, दरवाजाची बेल यांना स्पर्श करणे टाळा. आवश्यकतेनुसार स्पर्श केल्यास लगेच सॅनिटायझरने हात स्वच्छ करा.


शक्यतो हातात एक कागद बाळगा आणि त्या कागदाने आवश्यक त्या वस्तूंना स्पर्श करा. नंतर तो कागद कचराकुंडीत टाकून द्या.


बाहेरून घरी परतताच कुठेही स्पर्श करण्याआधी हात-पाय, चेहरा, मानेचा भाग पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि रुमालाने अथवा टॉवेलने कोरडे करुन घ्या. अथवा सॅनिटायझरने हात स्वच्छ करुन घ्या.


या वेळी आरोग्य सेवक एस एस साळुंखे यांनी माहिती देताना सांगितले सातारा जिल्ह्यातील 6 लाख 80 हजार घरापर्यंत पोचणारी " माझे कुटुंब माझी जबाबदारी " ही महत्वाकांक्षी मोहीम आहे. 


या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक घरात महिन्यात दोन वेळा आरोग्याची चौकशी करण्यासाठी आरोग्य पथकाची एक टीम जाणार आहे. मास्कचा वापर आता स्वतःच्या सुरक्षेसाठी 'ब्लॅक बेल्ट' म्हणून करावा. सदा सर्वदा मास्क लावावा. शिवाय बाहेरून आल्यानंतर कुटुंबाला विषाणूचा संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी. 


ग्रामस्थांनी किमान सोपे उपाय केले तरी ते स्वतःला तसेच त्यांच्या आसपासच्या अनेकांना कोरोना संकटापासून दूर ठेवू शकतात.  


आरोग्य विभागाने ग्रामस्थांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी निवडक सोपे उपाय सांगितले आहेत.या मध्ये घराबाहेर पडताना, सार्वजनिक ठिकाणी वावरताना प्रत्येकाने मास्कद्वारे नाक-तोंड झाकून घ्यावे. 


साबण वा लिक्विड सोप आणि पाण्याचा वापर करुन हात धुवा नंतर रुमालाने अथवा टॉवेलने कोरडे करुन घ्या. अथवा सॅनिटायझरने हात स्वच्छ करुन घ्या. स्वच्छ हातांवर ग्लोव्हज घाला. नाक-तोंड मास्कने झाकून घ्या. नंतर घराबाहेर पडा, 


            कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामसेवक अनिल जाधव यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.