कोरोना काळात मंद्रुळकोळे ग्रामपंचायतीचे कार्य कौतुकास्पद : हिंदुराव पाटील.


ग्रामपंचायतीस आक्सिजन मशिन लोकार्पण करताना हिंदुराव पाटील,अभिजीत पाटील, सरपंच अमोल पाटील व इतर


आनंदराव चव्हाण पतसंस्था, अष्टविनायक बिल्डर्स ग्रुप, व रणजित पाटील यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी.


ढेबेवाडी / प्रतिनिधी : कोरोनाच्या संकटात मंदुळकोळे ग्रामपंचायतीने सतर्क राहून चांगले काम केले,ग्रामस्थांना आरोग्य सेवा देत कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न केले मात्र ऑक्सिजन मशिनची गरज लक्षात घेत आनंदराव चव्हाण पतसंस्था व अष्टविनायक बिल्डर्स ग्रुप,आणि रणजित पाटील यांनी ग्रामपंचायतीला 3 ऑक्सिजन   मशिन देवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.


असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रांतीक प्रातिनिधी हिंदुराव पाटील यांनी व्यक्त केले. 


         मंदुळकोळे ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. आनंदराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत पाटील, सरपंच अमोल पाटील,मंडलाधिकारी प्रविण शिंदे,डाॅ.कोमल जाधव,उपसरपंच पोपट कळंत्रे, तलाठी संजय काशिद,आणि ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांची उपस्थिती होती. 


      यावेळी बोलताना अभिजीत पाटील यांनी ग्रामपंचायत कामाचा गौरव करून सरपंच व समितीला धन्यवाद दिले.कोरोना संकटात लोकांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. यांची दक्षता घेवून छोटे आजार अंगावर काढू नका असे आवाहन केले.


      यावेळी मंडलाधिकारी प्रविण शिंदे,डाॅ कोमल जाधव यांनी मार्गदर्शन केले, पोपट कळंत्रे यांनी आभार मानले.


 


Popular posts
उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रीपदा सोबतच आमदारकीचाही राजीनामा ; बंडखोर आमदारांवर शेवटच्या भाषणातही खेद.
इमेज
एका पानावर लिहला संपूर्ण हरिपाठ
इमेज
बंडखोरांना इशारा ते राजीनाम्याची तयारी... उद्धव ठाकरेंच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे
इमेज
योगेश टोंपे व मीना साळुंखे यांच्या कार्याला पाटणच्या जनतेचा सलाम!
इमेज
गुढे ता.पाटण येथील वि.का.स. सेवा सोसायटी चेअरमन पदी रविंद्र पाटील तर व्हा. चेअरमन पदी शिवाजी माने यांची बिनविरोध निवड.
इमेज