माजी पंचायत समिती सदस्य हरीषशेठ भोमकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.


माजी पंचायत समिती सदस्य हरीषशेठ भोमकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन. 


पाटण/प्रतिनिधी (रमेश देसाई) :


कोयनाभागतील नेते व पाटण पंचायत समितीचे माजी सदस्य हरिषशेठ भोमकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले, आणि कोयनाभागावर शोककळा पसरली. 


कोयनाभागतील तरुणांच्या गळ्यातील ताईत, कोणत्याही पक्षातील तरुण हा त्यांचा चाहता वर्ग होता. 


कोयनाभागतील राजकीय व सामाजिक कार्यात हरिषशेठ भोमकर नेहमीच आघाडीवर असायचे. 


गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे कट्टर समर्थक म्हणून देखील त्यांची ओळख होती, भोमकर शेठ हे शिवसेना आणि देसाई गटासाठी वरदानच ठरले होते, मागील काही वर्षांत कोयनाभागतील विरोधकांच्या अनेक ग्रामपंचायती त्यांनी देसाई गटात आणल्या त्यामुळे त्यांच्या जाण्याने देसाई गटात ही हळहळ व्यक्त होत आहे.


कोयनाविभागातील स्मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे ते सदैव स्मरणात राहतील. त्यांच्या आत्म्यास चिर:शांती मिळो. 


ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातुन सावरण्याची शक्ति देवो. कोयना परिसर व कोयनाविभाग रहिवाशी संघटनेच्या वतीने अशा मनमिळाऊ आणि सेवाभावी नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली. 


Popular posts
उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रीपदा सोबतच आमदारकीचाही राजीनामा ; बंडखोर आमदारांवर शेवटच्या भाषणातही खेद.
इमेज
एका पानावर लिहला संपूर्ण हरिपाठ
इमेज
बंडखोरांना इशारा ते राजीनाम्याची तयारी... उद्धव ठाकरेंच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे
इमेज
योगेश टोंपे व मीना साळुंखे यांच्या कार्याला पाटणच्या जनतेचा सलाम!
इमेज
गुढे ता.पाटण येथील वि.का.स. सेवा सोसायटी चेअरमन पदी रविंद्र पाटील तर व्हा. चेअरमन पदी शिवाजी माने यांची बिनविरोध निवड.
इमेज