स्वर्गीय पी.डी.पाटीलसाहेब  यांच्या १२ व्या पुण्यतिथी निमित्त पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील यांच्या वतीने आदरांजली. 


स्वर्गीय पी.डी.पाटीलसाहेब  यांच्या १२ व्या पुण्यतिथी निमित्त पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील यांच्या वतीने आदरांजली. 


कराड /प्रतिनिधी :


आधुनिक कराडचे शिल्पकार व परिसराचे भाग्यविधाते आदरणीय स्वर्गीय पी.डी.पाटीलसाहेब यांच्या १२ व्या पुण्यतिथीदिनी कराड येथील त्यांच्या सामधीस्थळी अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील, आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब सहकारी बँकेचे चेअरमन अशोकराव पाटील, ज्योतिर्लिंग विकास सोसायटीचे संस्थापक अरुण पाटील, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाषराव पाटील, आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब सहकारी पाणी पुरवठा संस्थेचे चेअरमन प्रकाश पाटील, श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट कराडचे चेअरमन जयंत पाटील, आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब सहकारी बॅंकेचे संचालक सागर पाटील, कराड नगरपरिषदेचे नगरसेवक सौरभ पाटील, दिग्विजय पाटील, कराड उत्तरचे युवा नेते, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक जशराज पाटील, पार्थेश पाटील, आदरणीय स्वर्गीय पी.डी.पाटीलसाहेब स्मारक समितीचे उपाध्यक्ष डॉ.अशोक गुजर, माजी उपनागराध्यक्ष संभाजीराव सुर्वे, माजी नगरसेवक मानसिंगराव पाटील, दिलीप चव्हाण, जगन्नाथ माने, ए.एन.मुल्ला, प्राध्यापक रामभाऊ कणसे व इतर मान्यवर उपस्थित होते.


 


कोरोना (कोविड १९) च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सचे सर्व नियम पळून प्राथमिक स्वरूपात आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांचे कुटुंबीय व आदरणीय स्वर्गीय पी.डी.पाटीलसाहेब स्मारक समितीच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.