श्री संतकृपा इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग मध्ये आॅनलाईन पध्दतीने "इंजिनिअर्स डे" संपन्न.


श्री संतकृपा इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग मध्ये आॅनलाईन पध्दतीने "इंजिनिअर्स डे" संपन्न.


आपली आवड, कल, क्षमता, पाहून भविष्यातील करीअरची दिशा ठरवा उद्योजक: सचिन नागपूरे


कराड दि. : विध्यार्थ्यांने आपली आवड, कल, क्षमता पाहूनच आपल्या भविष्यातील व्यवसाय, नोकरी याची निवड करावी. जीवनाची दिशा ठरवावी व त्याच प्रमाणे जीवनाचे उद्दिष्टये असणे गरजेचे आहे. तरच आपण आपल्या भावी आयुष्यात यशस्वी होऊ शकतो.


असे प्रतिपादन पूणे येथील Dran इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड चे डायरेक्टर सचिन नागपूरे यांनी केले. 


घोगांव तालुका कराड येथील श्री संतकृपा इंजिनिअरिंग बी. टेक या महाविद्यालयाच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आॅनलाईन पध्दतीने "इंजिनिअर्स डे" साजरा करण्यात आला. झूम ॲप द्वारे सुमारे २०० विधाथीँ तसेच शिक्षक आॅनलाईन या कार्यक्रमात सहभागी झाले होते.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रसून जोहरी होते. 


या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सचिन नागपूरे होते. 


यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 


यावेळी पुणे येथील  इंडस्ट्री कॉर्डिनेटर प्रसाद भागवत, प्राचार्य स्वानंद कुलकर्णी आदी मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते. 


यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सचिन नागपुरे पुढे म्हणाले विद्यार्थ्याने कॉलेजमध्ये घेतलेले ज्ञान व कौशल्य त्याच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण बदल घडवू शकतात. प्रत्येक विद्यार्थ्याकडे एक वैशिष्ट्यपूर्ण गुण असतो. तो प्रत्येकाने ओळखून नोकरीमध्ये आपले डिपार्टमेंट निवडा. इंडस्ट्रीमध्ये प्रथमता डिपार्टमेंट स्किल तपासले जाते. आवडणाऱ्या विषयात आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करा व पुढे जा. 


प्रत्येक तरुणांमध्ये एक ऊर्जा असते ती जिवंत ठेवायची असेल तर आपल्याकडे निश्चितच उद्दिष्ट असले पाहिजे. प्रत्येकाने आपले कौशल्य विकसित केले पाहिजे. आपल्यातील कलागुणांचा शोध घेतला पाहिजे तोच विद्यार्थी जीवनात यशस्वी होऊ शकतो. आपल्यातील क्षमता आपणच शोधली पाहिजे तरच आपण जीवनात अमुलाग्र बदल करू शकतो.  


यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेचे सचिव प्रसून जोहरी म्हणाले जीवनात सदैव सकारात्मक असणे गरजेचे आहे. तुम्ही भविष्यातील या देशाचे आदर्श इंजिनिअर आहात. त्यामुळे तुम्ही नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करा व त्याचा परिपूर्ण अभ्यास करा तुम्ही निश्चित यशस्वी व्हाल. "इंजिनिअर्स डे" च्या आपणा सर्वांना शुभेच्छा. 


 महाविद्यालयाचे प्राचार्य स्वानंद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले व सर्व विद्यार्थ्यांना . "इंजिनिअर्स डे" च्या शुभेच्छा दिल्या. 


 प्रज्ञा कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला.  


अमित जगदाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थित सर्व मान्यवर, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार मानले.