प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या माध्यमातून कोरोना योध्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.


प्रहार अपंग क्रांती संघनटनेच्या माध्यमातून कोरोना योध्यांना ''ऋणपत्र''.


प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या माध्यमातून कोरोना योध्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.


ढेबेवाडी दि. प्रतिनिधी :


कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे संपूर्ण जग आज थांबलेले पाहायला मिळत आहे. या जीवघेण्या व्हायरस मुळे अक्षरशः संपूर्ण जगात हाहाकार माजलाय. जगाच्या पाठीवर महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या देशांनी सुद्धा या आजारासमोर हात टेकले आहेत.


इतर प्रगत देशांच्या तुलनेत आपल्या देशात परिस्थिती नियंत्रणात आहे. प्रशासन, पोलिस, डॉक्टर्स, पोलीस पाटील मेडिकल स्टाफ,आशा सेविका, स्वच्छता कर्मचारी, पत्रकार हे देवदूत आपल्या देशाला या संकटातून वाचवन्यासाठी अहोरात्र झटत आहेत. या सर्व देवदूतांचे आपल्यावर खुप मोठे ऋण आहेत. यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकणार नाही. असे प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या पाटण तालुका अध्यक्षा विद्या कारंडे बोलत होत्या. प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत तहसीलदार समीर यादव,बिडीओ सीमा साळुंखे,पाटण तालुका आरोग्य अधिकारी आर.बी.पाटील ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे ,पाटण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी, मंडलाधिकारी प्रवीण शिंदे,आरोग्य अधिकारी डॉ. अरुण जाधव,डॉ. संदीप जाधव, पोलीस पाटील राजेश लोहार ,विजय सुतार,भगवान मत्रे तसेच कोतवाल हिंदुराव थोरात व विजय महापुरे यांना कोरोना योध्यांचा "ऋणपत्र" देऊन सन्मान करण्याचे प्रहार अपंग क्रांती या संस्थेने ठरवले.            


गेल्या सहा महिन्यांपासून कोरोना काळाच्या ओघात प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या तालुका अध्यक्षा सौ.विद्या कारंडे व त्यांची टीम यांनी अहोरात्र काम करत कोरोना पेशंट यांना बेड व्यवस्था, अन्नपुरवठा तसेच कोरोना पेशंट यांना संघटनेच्या वतीने मायेचा आधार देण्याचे काम केले         


 या वेळी संघटनेचे वैभव काळे ,मयूर माने,रमेश टेळे, महादेव पाटील ,शुभम उबाळे उपस्थित होते.


Popular posts
योगेश टोंपे व मीना साळुंखे यांच्या कार्याला पाटणच्या जनतेचा सलाम!
इमेज
आंबेघर येथे दरड कोसळल्याने 3 कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली.
इमेज
सातारा जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश ; 'या' वेळेत सर्व दुकाने, आस्थापनांना परवानगी
इमेज
काळगाव विभागात पावसाचा कहर ; जोशीवाडी येथील लोक रात्रीच झाले स्थलांतरीत.
इमेज
पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांची आंबेघरला भेट शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार
इमेज