खारघर राष्ट्रवादी शहर अध्यक्षपदी सुरेश रांजवण यांची निवड.


खारघर राष्ट्रवादी शहर अध्यक्षपदी सुरेश रांजवण यांची निवड


 


नवी मुंबई - महाराष्ट्राचे जाणते राजे शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारांने प्रेरित झालेले व आम.मानसिंगराव नाईक यांचे समर्थक,साईदत्त परिवाराचे शिल्पकार,गोरगरिबांना सदैव मदत करणारे सुरेश भाऊ रांजवण यांची नवी मुंबई खारघर शहर अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे.त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


   सतत लोकांच्या मदतीला धावणारे,सर्वांच्या सुख दुःखात सहभागी असलेले मनमिळावू स्वभावाचे रांजवण यांनी आजपर्यंत अनेक गरजूंना, रुग्णांना, सढळ हस्ते मदत केली आहे.आपल्या गावची जी.प.शाळा दत्तक घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे.त्याचबरोबर त्यांनी जन्माला येणाऱ्या मुलींना जगवले पाहिजे त्यांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून मुलगी जन्मताच तिच्या नावे पोस्टात काही रक्कम जमा करण्याचा संकल्प केला असून तो सद्या राबवत देखील आहेत.शिराळा तालुक्यातील इतरांना लाजवेल अशी त्यांची ओळख सर्व परिचित आहे.त्यांना आजतोपर्यंत राज्यस्तरीय अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या या बाबींचा विचार करून राष्ट्रवादी खारघर यांनी त्यांना ही शहर अध्यक्षाची जबाबदारी दिली आहे.


Popular posts
उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रीपदा सोबतच आमदारकीचाही राजीनामा ; बंडखोर आमदारांवर शेवटच्या भाषणातही खेद.
इमेज
एका पानावर लिहला संपूर्ण हरिपाठ
इमेज
बंडखोरांना इशारा ते राजीनाम्याची तयारी... उद्धव ठाकरेंच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे
इमेज
योगेश टोंपे व मीना साळुंखे यांच्या कार्याला पाटणच्या जनतेचा सलाम!
इमेज
गुढे ता.पाटण येथील वि.का.स. सेवा सोसायटी चेअरमन पदी रविंद्र पाटील तर व्हा. चेअरमन पदी शिवाजी माने यांची बिनविरोध निवड.
इमेज