संतोष लिंबोरे यांची अध्यक्ष पदी हट्रिक तर कविता घडशी यांना बढती.


संतोष लिंबोरे यांची अध्यक्ष पदी हट्रिक तर कविता घडशी यांना बढती.


 


लावणी कलावंत महासंघाची ञैवार्षिक निवडणूक या लॉकडावूनच्या परिस्तिथी मध्ये बिनविरोध सभासदांच्या सहमतीने पार पडली.या निवडणुकीत पुन्हा तिसरी वेळ संतोष लिंबोरे हे अध्यक्षपदी निवडून आले.जयेश चाळके सरचिटणीस तर चंद्रकांत बारशिंगे पुन्हा एकदा कार्याध्यक्ष म्हणून निवडून आले.कविता घडशी यांना बढती मिळाली व ते खजिनदार पदावर निवडून आल्या.समनव्यक म्हणून विशाल सदाफुले यांची तर अंतर्गत हिशेब तपासणीस पदावर आसावरी तारे या निवडून आल्या.उपाध्यक्षपदी संदेश पाटील,माधुरी भांभिड.चिटणीसपदी योगिता मौर्जे,प्रीती मोहोते, उपकार्याध्यक्षपदी संदेश गायकवाड, अनिल हंकारे. उपखजिनदारपदी अजय जाधव यांची निवड झाली.कार्यकारणी सदस्य म्हणून विजय कर्जावकर, गौरी जाधव,मृणाली सावर्डेकर, स्नेहल परबते,विकास सोनवणे,वंदना भोसले यांची निवड झाली.