कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिंती विविध सेवा सोसायटी ची सामाजिक बांधिलकी.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिंती विविध सेवा सोसायटी ची सामाजिक बांधिलकी.


उंडाळे दि /प्रतिनिधी 


"माझे कुटुंब माझी जबाबदारी" मोहिमेसाठी जिंती सोसायटीकडून तपासणी साहित्य व उपकरणे आशा सेविका यांचेकडे मंडलाधिकारी नागेश निकम व येवती प्राथमिक ओरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ सुभाष पाटील यांचे हस्ते वाटप करणेत आले.


जिंती गावात कोविड 19ची गंभीर स्थिती निर्माण झाल्याच्या पार्शवभूमीवर "माझे कुटुंब माझी जबाबदारी" या शासनाच्या महत्वकांक्षी योजनेला बळकटी देऊन गावातील कोविड ची साखळी तोडण्याच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन समिती चे मागणीनुसार जिंती विविध सेवा सोसायटीकडून तपासणी साहित्य व उपकरणे आशा सेविकांच्याकडे भेट म्हणून देण्यात आली.


  यामध्ये टेंपरेचर, ऑक्सिमिटर,हॅन्डग्लोज,फेस शिल्ड ही उपकरणे व सुरक्षिततेसाठी लागणारे तपासणी साहित्याचे  नागेश निकम,सुभाष पाटील यांचे हस्ते वाटप करणेत आले.


सोसायटीच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतूक केले.


कोरोना साखळी तोडण्यासाठी ग्रामस्थांनी नियमाचे काटेकोर पणे पालन करावे असे आवाहन नागेश निकम यांनी यावेळी केले.


यावेळी तलाठी कुलकर्णी मॅडम,पोलीस पाटील संतोष पाटील,ग्रा. प. सदस्य राजेंद्र पाटील,रि. पी एस आय अशोकराव पाटील,बबन चेअरमन,जिंती सोसायटीचे सदस्य ए आर पाटील,पै.संभाजी पाटील,सोसायटीचे सचिव प्रकाश पाटील,महसूल कर्मचारी श्रीकांत साळूखे, ग्रामपंचयात कर्मचारी बाळासो देसाई आशा सेविका,अंगणवाडी ताई, ग्रामस्थ व  आपत्ती व्यवस्थापन समिती चे सदस्य  उपस्थित होते .


सर्वांचे स्वागत ए आर पाटील यांनी केले.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


ग्रामपंचायत च्या माध्यमातून गावात कोविड रुग्णासाठी अत्यावश्यक बाब म्हणून ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करणेस प्रशासक पोतदार साहेब यांनी मंजुरी दिली असून लवकरच हे उपकरण गावच्या सेवेत रुजू होईल अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील यांनी दिली.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖