बाजार समितीने जबरदस्तीने सुरु केलेले पेट्रोल पंपाचे काम त्वरित थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू: डॉ.दिलीपराव चव्हाण.

 


ढेबेवाडी दि -- मानेगांव (ता.पाटण) येथील बाजार समितीच्या जागेवर ब्रिटिश काळापासुन विभागातील शेतकरी पाळीव जणावरांचा बाजार भरवित आहेत, शेतकऱ्यांच्या स्वतंत्र्यांवर गधा आणून बाजारसमितीने या जागेवर आता बेकायदेशीर पणे पेट्रोल पंप आणि धाबा उभारण्याचा घाट घातला आहे. हे आम्ही कदापि सहन करणार नाही. ही जागा जणावरांच्या बाजारासाठीच वापरण्यात येईल बजारसमितीने जर जबरदस्ततीने पेट्रोल पंप आणि धाबा उभारण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण यांनी पत्रकार परीषदेत दिला.


               डॉ. चव्हाण पुढे म्हणाले ब्रिटिश काळापासून मानेगांव येथे शेतकर्‍यांच्या पाळीव प्राण्यांचा खरेदी- विक्रीचा बाजार भरत आहे. या बाजारात तालुक्यासह परजिल्हयातून जनावरे विक्रीसाठी येत असतात त्यामुळे विभागातील शेतकऱ्यांना जनावरे विकत घेणे आणि देणे या दोन्ही गोष्टींंचा चांगलाच फायदा होत होता. महाराष्ट्रात बाजारसमित्यांची निर्मिती झाली तेंव्हा पासून म्हणजे 1967-68 सालापासुन सुमारे दोन एकर जागा मानेगांव ग्रामपंचायतीने शेती उत्पन्न बाजार समीती पाटण यांच्या ताब्यात दीली त्यावेळी सदर जागेचा उपयोग फक्त पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची जनावरे खरेदी आणि विक्री साठी वापर करायचा असे ग्रामस्थांसमोर ठरले होते. 


              लाँकडाऊन काळात बाजार समीतीच्या पदाधिकाऱ्यांनी सदर जागेवर पेट्रोल पंप उभारणीसाठी ग्रामपंचायतीकडे परवानगी मागीतली असता ती ग्रामसभेने नामंजूर करुन तो अर्ज प्रलंबित ठेवला होता. दरम्यान मानेगांव ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचासह सर्व सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने शासनाने पंचायतीवर प्रशासक नेमला आहे. बाजार समीतीने कोणतीही परवानगी न घेता नियमांची पायमल्ली करुन पेट्रोल पंपासाठी जागेचे सपाटीकरण करुन खोदकाम व टाकी बसवण्याचे काम बेकायदेशीर पणे केले आहे. बाजार समीतीच्या पदाधिकाऱ्यांनी दांडगाव्याने पंपाचे काम करून शेतकऱ्यांच्या जनावरांच्या बाजारावर आतिक्रमण करण्याचे काम त्वरित थांबवावे.ग्रामस्थांचा विरोध झुगारून आज पर्यंत जे बेकायदेशीर पणे खोदकाम आणि सपाटीकरण केले आहे याची गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचेकडून चौकशी लावणार असून तसे निवेदन ना. देसाई यांना दिले असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगीतले. बाजारसमितीने बेकायदेशीर पणे चालवलेले काम त्वरित थांबवावे अन्यथा विभागातील शेतकऱ्यांना घेवून तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे डॉ. दिलीप चव्हाण यांनी सांगितले.


          यावेळी मानेगांव सोसायटीचे चेअरमन आनंदा शामराव माने, माजी उपसरपंच जालिंदर माने, माजि चेअरमन काढणे आनंदराव रामचंद्र पाटील , शिवदौलत बँकेचे माजी संचालक मधुकर पाटील, मनोज मोहिते, जोतिराज काळे यासह विभागातील विविध संघटनाचे  पदाधिकारी उपस्थित होते.