गोपाळकाला उत्सव साजरा न करता पाटील कुटुंबीयांनी केली कोरोना योद्ध्यांना मदत. या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक.


उंडाळे:आशा सेविका, अंगणवाडी सेविका, यांना किट देताना डॉ श्रीधर पाटील, उदय पाटील, दादासाहेब पाटील, बापूराव पाटील, धनाजी पाटील दिग्विजय पाटील आदी 


उंडाळे/प्रतिनिधी (जगन्नाथ माळी)


उंडाळे ता. कराड येथील पाटील कुटुंबीय गेली कित्येक वर्षे  श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपालकाला अंखड सुरु होता,मात्र या वर्षी कोरोना वैश्विक महामारी मुळे उत्सव साजरा न करता आशा सेविका, अंगणवाडी सेविका या कोरोना योद्धा यांना मास्क, आँक्सीमिटर, आदी पंचवीस हजार रुपयेचे साहित्य भेट दिले. या उपक्रमाचे ग्रामस्थातून कौतुक होत आहे. येथील माजी सरपंच ( कै) लक्ष्मण नाथा पाटील.तात्या. याचे नातू डॉ.श्रीधर पाटील, उदय पाटील हे पाटील कुंटुबिय गेली कित्येक वर्षे श्रीकृष्ण जन्मकाळ हा उत्सव मोठ्याप्रमाणात साजरा केला जातो. परंतु यावर्षी कोरोना महामारी संकटामुळे  उत्सव साजरा न करण्याचा निर्णय पाटील कुटुंबियांनी घेतला. पण गोपाळकाल्याचे अन्नदान व इतर कार्यक्रमात खंड पडला. तो खंड पडू नये म्हणुन या महामारीत घरोघरी जावून सर्वे करणाऱ्या कोरोना महिलायोध्या आशा सेविका,अंगणवाडी सेविका व मदतणीस यांना आँक्सीमिटर, सॅनिटायझर दहा लिटर, मास्क पाचशे, हातमोजे,सनकोट 12 असे सुमारे पंचवीस हजार रुपये किमतीचे साहित्य सरपंच दादासाहेब पाटील, डॉ.श्रीधर पाटील, उदय पाटील, धनाजी पाटील, अक्षय पाटील, दिग्विजय पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी डॉ श्रीधर पाटील यांनी कोरोना विषाणू संक्रमण कसे रोखावे, स्वताची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी बापूराव पाटील, धनाजी पाटील, काशिनाथ सूर्यवंशी, व पाटील कुटुंबीय उपस्थित होते. दादासाहेब पाटील यांनी आभार मानले.