मागणी नसल्याने झेंडूची फुलशेती अडचणीत. शेतकऱ्यांनी फुले उकिरड्यात टाकली.


उंडाळे: फुलांना मागणी नसल्याने शेतकऱ्यांनी उकिरड्यात टाकलेली झेंडूची फुले. 


 


मागणी नसल्याने झेंडूची फुलशेती अडचणीत. शेतकऱ्यांनी फुले उकिरड्यात टाकली.फूलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी फुल उत्पादक शेतकरी करत आहेत. 


उंडाळे /जगन्नाथ माळी : 


वातावरणातील बदलामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असताना पितृपंधरवडा, अधिक मास, व मंदिरे बंद असल्याने शेतकऱ्यांनी फुलवलेली झेंडूची बाग त्यात फुललेली फुले उकिरडयात टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून फुलशेती करणारे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सध्या परिसरात खरीप हंगाम पिकाची काढणी सुरू आहे. अतिपावसामुळे कडधान्याची पिके कुजून गेली.भूईमूगला पाहिजे असा उताराही मिळत नाही. पावसामुळे शेंगा व्यवस्थित भरल्या नाहीत अशा अडचणीत शेतकरी सापडला असताना काही शेतकऱ्यांनी फुल शेती करण्यास सुरुवात केली जून महिन्यात झेंडूची रोपे आणून त्याची लागवड केली आंतरपीक म्हणून घेवडा घेतला पण अति पावसामुळे घेवडा पूर्ण कूजून गेला. तर दुसरे पिक झेंडूची बाग कशी चांगली येईल यासाठी शेतकरी प्रयत्न करु लागले. अति पावसामुळे पिकावर ताबेरा, करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून विविध औषध फवारणी करत अति कष्टाने झेंडूची बाग फुलवली. त्याला योग्य प्रकारे खते देऊन बागेला झोकात आणली पण कोरोना महामारी च्या संकटात सण-उत्सव साजरे करण्यावर मर्यादा, पितृपंधरवडा, सुरु होणारा अधिकमास, मंदिरे बंद त्यामुळे फुलांना पाहिजे अशी मागणी मिळाली नाही. त्यामुळे फुलांना मागणी नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी झेंडूची फुले उकिरडयात फेकण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे. 


 फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे 


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


याबाबत झेंडूची फुल शेती करणारे येथील शेतकरी हणमंत माळी म्हणाले मी जूनमध्ये 10 गुंठे क्षेत्रात झेंडूची बाग घेतली त्यासाठी 3 हजार रुपये किमतीचे रोपे घेतली. औषध फवारणी, खते यासाठी 8 हजार रुपये खर्चून बाग झोकात आणली पण फुले लागल्या पासून आजपर्यंत पाहिजे अशी फुलांना मागणी नाही त्यातच पितृपंधरवडा, अधिक मास, मंदिरे बंद असल्यामुळे फुलांना पाहिजे त्या प्रमाणामध्ये मागणी नाही. त्यामुळे फुले उकिरडयात टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अशा संकटाला सामोरे जावे लागत आहे तर शासनाकडून फूलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी फुल उत्पादक शेतकरी करत आहेत.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖