भोसगांवचे उपसरपंच चंद्रकांत बोत्रे (सर) यांचे  अल्पशा आजाराने निधन. 


भोसगांवचे उपसरपंच चंद्रकांत बोत्रे (सर) यांचे  अल्पशा आजाराने निधन. 


सणबूर दि. : भोसगांव (ता. पाटण) चे उपसरपंच चंद्रकांत बोत्रे (बोत्रे सर) यांचे रविवारी दि.6-9-2020 पहाटे 4 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते रयत शिक्षण संस्थेत वरीष्ठ लिपिक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. त्यांचा सामाजिक धार्मिक कार्यक्रमात हिरहिरीने सहभाग असायचा. त्यांची सामाजिक कार्याची आवड पाहून गावाने त्यांची बिनविरोध भोसगांव ग्रामपंचायतीवर उपसरपंच म्हणून निवडून दिले होते. पंचायतीच्या माध्यमातून बोत्रे सरांनी कोविड योध्दा म्हणून चांगले कार्य केले त्यांनी गणेश मंडळा मार्फत सँनिटायजर फवारणी , कोरोना आजाराविषयी जणजागृती केली तसेच वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, एक गांव एक गणपती यासह अनेक सार्वजनिक हिताची कामे केली आहेत. त्यांच्या जाण्याने भोसगांवावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा , मुलगी, बहिन,भाऊ, पुतणे सुन नातवंडे असा परीवार आहे.


Popular posts
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी
इमेज
साताऱ्यात राष्ट्रवादीला सुरुंग, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ शिवसेनेत दाखल.
इमेज
पाटण बाजार समितीच्या सभापतीपदी बाळकृष्ण पाटील तर उपसभापतीपदी विलास गोंडांबे यांची निवड.
इमेज
मान्याचीवाडी गावाने पटकावला पन्नास लाख रुपयांचा माझी वसुंधरा अभियान राज्यस्तरीय पुरस्कार.
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायती तर्फे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.
इमेज