कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मल्हारपेठ बाजारपेठ तीन सप्टेंबर पर्यंत बंद.

 


पाटण / प्रतिनिधी (भगवंत लोहार)


पाटण तालुक्यातील कापड व सोने चांदीसह इतर खरेदीसाठी प्रसिद्ध असणारी मल्हारपेठ बाजारपेठ आजपासून 3 सप्टेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत व ग्राम कृती समितीने घेतला आहे 


मल्हारपेठ ही पाटण तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असून गेल्या काही दिवसात कोरोनाचा प्रसार मुख्य बाजारपेठ, पवार आळी, दिंडुकलेवाडी परिसरात मोठ्या वाढला आहे कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ही बाजारपेठ बंद ठेवण्याबाबत ग्रामपंचायत, ग्राम कृती समिती व व्यापारी वर्ग यांची बैठक झाली यामध्ये 1 ते 3 सप्टेंबर अखेर बाजारपेठ बंद ठेवण्यावर निर्णय झाल्याने त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे दरम्यान गेल्या आठ दिवसापासून नवारस्ता बाजारपेठ बंद ठेवली होती ती आता आजपासून सुरू होणार होती मात्र कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन पुन्हा बंदचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून नवारस्ता बाजारपेठ शुक्रवार दि 4 अखेर बंद ठेवण्यात आली आहे.