खा.शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा शब्द ना.शंभूराज देसाई यांनी पाळला.


गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे मार्गदर्शनाखाली लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखाना कार्यस्थळावर उभारतोय ऑक्सीजनसह ५० बेडचे कोरोना सेंटर.


युवानेते यशराज देसाई (दादा) यांची माहिती.


पाटण /प्रतिनिधी : देशाचे माजी कृषीमंत्री शरदचंद्रजी पवारसाहेब व राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांच्या हाकेला ओ देत राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे मार्गदर्शनाखाली दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ऑक्सीजनसह ५० बेडचे कोरोना सेंटर उभारण्यात येणार असून तातडीने या कामांला सुरुवात करण्याच्या सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केल्या असून येत्या पाच ते सहा दिवसात देसाई कारखाना कार्यस्थळावर ऑक्सीजनसह ५० बेडचे कोरोना सेंटर सुरु होणार असल्याची माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या वतीने युवानेते यशराज देसाई (दादा) यांनी प्रसिध्दीस दिली आहे.


 


         प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की,पाटण तालुक्यात कोरोनाचे बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कराड व सातारा येथे रुग्णांना पाठविणे गैरसोईचे होत असल्यामुळे राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या विशेष प्रयत्नातून ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोवीड रुग्णालय प्रत्यक्षात सुरु झाले आहे तर पाटणच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतीगृहामध्ये ऑक्सीजनसह २५ बेडचे काम तात्काळ सुरु करण्याच्या सुचनाही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी तालुका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.त्यानुसार पाटण येथील वसतीगृहामध्ये २५ बेडच्या कामांला तालुका प्रशासनाच्या वतीने सुरुवात देखील केली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात हे सेंटर कोरोना बाधितांच्या उपचाराकरीता सेवेत आणण्यात येणार आहे. सातारा येथील शिवाजी संग्रहालयात ३०० बेडचे जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटर सुरु करणेसंदर्भात राज्याचे माननीय मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांचेकडे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी मागणी करताच त्यांनी तात्काळ यास मान्यता दिली असून सातारा येथील शिवाजी संग्रहालयात ३०० बेडचे जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटरच्या कामाला सुरुवात देखील झाली आहे.


 


              पाटण तालुक्यातील वाढती कोरोना बाधितांची संख्या व कराड तसेच सातारा येथे पाटण तालुक्यातील कोरोना रुग्णांना मिळत नसलेले बेड लक्षात घेता लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक व राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखाना कार्यस्थळावर तातडीने ऑक्सीजनसह ५० बेडचे कोरोना सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेत दौलतनगरला कारखाना कार्यस्थळावर तातडीने हे कोरोना सेंटर सुरु करण्याच्या सुचना केल्या आहेत.जागेची निश्चीती कारखाना कार्यस्थळावर करण्यात आली असून येत्या पाच ते सहा दिवसात ऑक्सीजनसह ५० बेडचे हे कोरोना सेंटर सुरु करण्यात येणार असून पाटण तालुक्यातील कोरोना बाधितांची होणारी गैरसोय या सेंटरमुळे दुर होण्यास मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी शेवठी पत्रकात म्हंटले आहे.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


राज्याचे नगरविकास मंत्री ना.एकनाथजी शिंदे हे करणार या सेंटरला आवश्यक ती मदत.


            लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर सुरु करण्यात येणाऱ्या कोरोना सेंटरकरीता तांत्रिक तसेच आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देणेकरीता तसेच आवश्यक असणारी सर्वोतोपरी मदत व सहकार्य करणार असल्याचे शिवसेना गटनेते,राज्याचे नगरविकास व सार्वजनींक बांधकाम मंत्री ना.एकनाथजी शिंदेसाहेब यांनी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंना सांगितले आहे.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


• Advertisements