कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बनपुरी गावची सामाजिक बांधिलकी.
सणबूर प्रतिनिधी | प्रमोद पाटील
कोविड १९ आजाराचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे रुग्णालयत रुग्णाना बेड शिल्लक नाहीत त्यामुळे अनेक रुग्णाना वेळेत उपचार मिळत नाही अशी वेळ आपल्या गावातील कोणत्याही रुग्णावर येऊ नये म्हणून गावातील युवकांनी अशोक पाटील सर यांनी मांडलेल्या संकल्पनेला प्रतिसाद देत सोशल मीडियाच्या माध्यमातून केवळ दोन दिवसात लोकवर्गणी जमा करून दोन ऑक्सीजन मशीन व इतर साहित्य खरेदी केले ही बनपुरी गावातील युवकांनी दाखवलेली एकजूट तालुक्यातील युवकांच्यासाठी एक आदर्श आहे असे प्रतिपादन पाटण तालुक्याचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी केले
ते बनपुरी ता पाटण येथे आयोजित लोकवर्गणीतून खरेदी केलेल्या ऑक्सीजन मशिन २ नग थर्मामीटर,ऑक्सीमीटर,ब्लड शुगर टेस्ट कीट्स, हँड ग्लोज ,मास्क वगैरे साहित्य कोविड19 आजाराच्या अनुषंगाने ग्रामस्थांच्या सोयीसाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बनपुरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले या लोकार्पण कार्यक्रमा वेळी बोलत होते
यावेळी पाटणचे तहसिलदार समीर यादव , गटविकास अधिकारी मीनाताई सांळुखे , तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.बी आर पाटील ,मंडल अधिकारी प्रविण शिंदे व या संकल्पनेचे प्रेरणास्थान असणारे अशोक पाटील सर,सरपंच सौ नर्मदा कुंभार,उपसरपंच शिवाजीराव पवार,तंटामुक्ती चे अध्यक्ष शिवाजीराव जगदाळे, युवा उद्योजक महेश पाटील, प्रमोद पाटील, अनिल पाटील,चेअरमन दादासो देसाई,आरोग्य सेवक भांडे,आरोग्य सेविका पाडवे सिस्टर्स, डॉ गणेश पवार, कमलाकर पाटील, ग्रामसेवक तानाजीराव जाधवर व गावातील युवक , आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होते.
यावेळी प्रताधिकार तांबे यांनी बनपुरी गावातील युवकांचे व अशोक पाटील सर यांचे कौतुक केले व तालुक्यातील इतर मोठ्या गावातील युवकांनी आपल्या गावातील ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी एकत्रीत येऊन बनपुरी गावातील युवकांनी राबवलेले उपक्रम राबवावे.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील यांनी आरोग्य विषयक सूचना केल्या अशोक पाटील सर व उपसरपंच शिवाजीराव पवार यांनी या संकल्पने बाबत माहिती दिली उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रमोद पाटील यांनी केले, आभार शिवाजीराव जगदाळे यांनी मानले.