मंद्रुळकोळे येथे कृषी महाविद्यालय सरळगाव या महाविद्यालयाच्या वतीने शेतकर्‍यांना चारा बनवण्याचे प्रात्यक्षिक.


मंद्रुळकोळे येथे कृषी महाविद्यालय सरळगाव या महाविद्यालयाच्या वतीने चारा बनवण्याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना देण्यात आले. 


सणबूर / प्रतिनिधी :


मंद्रुळकोळे ता. पाटण येथे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ ( दापोली), संलग्न कृषी महाविद्यालय सरळगाव या महाविद्यालयाच्या चौथ्या वर्षाचा विद्यार्थी धनेश पाटील यांने ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत चारा बनविण्याचे प्रात्यक्षिक सादर करुन शेतकऱ्यांना प्रशिक्षित केले.


            यावेळी प्रात्यक्षिक सादर करताना यामध्ये १० किलो कडब्याचे तुकडे , २०० ग्रॅम युरीया, १०० ग्रॅम मीठ, २५० ग्रॅम गुळ १ लीटर पाण्यामध्ये मिश्रण करुन ते पाणी १० किलो कडब्यावर शिंपडून तो चारा २१ दिवस झाकून ठेवण्यास सांगितले व नंतर तो जनावरांना खायला देवावा.त्यामुळे जनावरांच्या दुधाची उत्पादन क्षमता वाढते व पचनक्रियेत वाढ होते. अशा पद्धतीने प्रत्यक्ष शेतक-यांन समोर करुन प्रशिक्षित केले. त्या वेळेस उपस्थित शेतकरी सुभाष पाटील,शुभदा पाटील ,वसंत पाटील, सतिश पाटील ,संजीवनी पाटील ,खाशीबाई पाटील ,दिनकर पाटील,रविंद्र पाटील,उत्कर्ष पाटील आदिंची उपस्थिती होती.


         यावेळी बोलताना प्रगतशील शेतकरी सुभाष पाटील यांनी सांगितले जनावरांचा चारा योग्य नियोजन नसल्याने मोठ्या प्रमाणात मात्र होत होता.परंतु धनेश पाटील यांनी प्रात्यक्षिक सादर करून दिलेल्या माहिती मुळे शेतकऱ्यांना चाऱ्याचे चांगले नियोजन करता येणार आहे. यामुळे दुधवाढ होवून शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे.