कोयना सहकारी बँक,शेती उत्पन्न बाजार समिती आणि शामराव पाटील पतसंस्था उंडाळे यांच्यावतीने सह्याद्री हॉस्पिटल कोविड सेंटरला २० पोर्टेबल ऑक्सिजन मशीन देण्यात आल्या.

कराड / प्रतिनिधी

कोयना सहकारी बँक,शेती उत्पन्न बाजार समिती आणि शामराव पाटील पतसंस्था उंडाळे यांच्यावतीने सह्याद्री हॉस्पिटल कोविड सेंटरला २० पोर्टेबल ऑक्सिजन मशीन देण्यात आल्या.

माजी मंत्री विलासराव पाटील -उंडाळकर यांचे मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या रयत संघटनेतील कोयना सहकारी बँक,शेती उत्पन्न बाजार समिती व शामराव पाटील पतसंस्था उंडाळे या संस्थेच्या वतीने सह्याद्री हॉस्पिटल कराड मध्ये सुरू असणाऱ्या कोविड सेंटरला २० पोर्टेबल ऑक्सिजन मशीन देण्यात आल्या त्याचे लोकार्पण प्रांताधिकारी कराडचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे,तहसीलदार अमरादिप वाकडे,जि प सदस्य व रयत संघटनेचे नेते  उदयसिंह पाटील,सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक दिलीपभाऊ चव्हाण,रयत संघटनेचे कार्यवाह धनाजी काटकर,शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव देसाई,खरेदी विक्री संघाचे चेअरमन रंगराव थोरात,पंचायत समिती कराडचे उपसभापती रमेश देशमुख,शामराव पंतसंस्थेचे चेअरमन बळवंत पाटील व मान्यवरांची उपस्थिती होती.