अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघठन पश्चिम महाराष्ट्र यांचे वतीने पाटण तालुक्यातील कोरोना योध्यांचा सन्मान. 


अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघठन पश्चिम महाराष्ट्र यांचे वतीने पाटण तालुक्यातील कोरोना योध्यांचा सन्मान. 


कुंभारगांव /प्रतिनिधी. 


अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघठन पश्चिम महाराष्ट्र यांचे वतीने राष्ट्रीय अध्यक्ष हरी शुक्ला यांचे मार्गदर्शना नुसार प्रभारी राष्ट्रीय सचिव संजय झाडोकार व उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, भारतीताई पवार व जिल्हा सचिव दीपाली खोत, जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत काळे यांच्या वतीने कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाटण तालुक्यातील कोरोना केअर सेंटर मध्ये रूग्णां साठी काम करण्याऱ्या कोरोना योध्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. ते कोरोना योद्धे खालील प्रमाणे -डॉ अरुण जाधव मेडिकल ऑफिसर, काळगांव. प्राथमिक आरोग्य केंद्र मंद्रुळकोळे डॉ. कोमल लोकरे, नितीन माने, सी.एच.डी. बंडा गोंडेकर, सी. एच. डी. आरोग्यसेवक स्वप्नील कांबळे, मयूर पाटील, टेक्निशन नीलम सूर्यवंशी, फार्मासिस्ट रजनी चव्हाण


यांना कोविड यौद्धा गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 


       तसेच दैनिक कृष्णाकाठ न्यूज माध्यमातून महाराष्ट्रतील जनतेपर्यंत कोविड 19 बाबत संपूर्ण माहिती दिल्या बद्दल संपादक चंद्रकात चव्हाण यांचा अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघठन पश्चिम महाराष्ट्र "कोविड यौद्धा" गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 


       तसेच कुंभारगाव व काळगाव विभागात लॉकडाउन पासून आज अखेर कोविड 19 संकट काळामध्ये जीवाची पर्वा न करता विभागातील जनतेला कृष्णाकाठच्या माध्यमातून कोविडबाबत माहिती पुरवल्या बद्दल कृष्णाकाठ चे प्रतिनिधी राजेंद्र पुजारी व कॅमेरामन अनिल देसाई यांनाही कोविड यौद्धा गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.