पत्रकार सुरेश मस्कर यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर


पत्रकार सुरेश मस्कर यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर


तळमावले/वार्ताहर


यशवंतराव चव्हाण फाउंडेशन मुंबई यांच्यावतीने पत्रकारिता विभागात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मस्करवाडी (काळगांव) येथील पत्रकार सुरेश मस्कर यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर झाला आहे.


पत्रकार सुरेश मस्कर हे विविध सामाजिक उपक्रमात सहभागी असतात. लोटळेवाडी येथील श्री स्वामी समर्थांचा मठ बांधण्यामध्ये त्यांचा पुढाकार आहे. तसेच गावातील विविध धार्मिक कार्यामध्ये ते नेहमी अग्रेसर असतात.


पत्रकार सुरेश मस्कर यांच्या पत्रकारिता व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थापक अध्यक्ष संजय सावंत यांनी व त्यांच्या संपूर्ण टीमने यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर केला आहे.


त्यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.