वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या वतीने सातारा जिल्ह्यातील कोरोना योध्यांचा सन्मान


सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचा कोरोना योद्धा म्हणुन सन्मान करताना WMO सातारा टीमचे पदाधिकारी. 


वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या वतीने सातारा जिल्ह्यातील कोरोना योध्यांचा सन्मान.


सातारा / प्रतिनिधी :


कोरोनाचे संकट संपूर्ण देशावर आले आहे. महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार केला आहे. अशा या संकटात समाजातील अनेक देवदुत लोकांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत यामध्ये डॉक्टर, पोलिस, पोलिस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी, रूग्णवाहीका चालक अशा अनेक घटकांनी कोरोना महामारी संकटात असलेल्या लोकांना, रुग्णांना मदतीचा हात दिला या जीवघेण्या संकटात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गरजूंना मदत केली. अशा देवदूतांचा कोरोना योद्धा म्हणून वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन च्या सातारा टीम च्या वतीने गौरव करण्यात आला. यामध्ये साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलचे डॉ. उदयराज फडतरे, जिल्हा परिषदेचे सीईओ संजय भागवत, सातारच्या जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते व साई रुग्णवाहिकेचे विनोद विभुते यांचा समावेश आहे. 


डॉ. उदयराज फडतरे यांनी रुग्णांना बेड मिळण्याकरिता तर मोलाची मदत केली आहेच पण सातारा जिल्ह्यात प्रथमच होम आयसोलेशन साठी डॉक्टरांनी एक वैद्यकीय पथक तयार करून रुग्णाच्या घरीच उपचार पद्धत सुरू केली त्याचा अनेक रुग्णांना लाभ मिळाला. 


जिल्हा परिषदेचे सीईओ संजय भागवत यांचे कार्य कौतुकास्पद आहे. प्रशासकीय यंत्रणावर अधिक ताण असताना कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी उत्तम प्रकारे प्रशासकीय व्यवस्थापन केले. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी ते म्हणाले कोरोनावर मात करण्यासाठी शासनाची "माझे कुटुंब माझी जबाबदारी" या मोहिमेत सर्वांनी सहभागी होणे काळाची गरज आहे. व सर्व सामाजिक संस्थांनी या माहीमेस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 


या आवाहनास वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन च्या सातारा टीमने त्वरित प्रतिसाद देत आम्ही प्रशासना बरोबर आहे याची ग्वाही दिली. 


कोरोनाच्या या महामारीत व लॉकडाउनच्या काळापासून सातारा जिल्ह्याची धुरा सांभाळून जिल्ह्यात चोख बंदोबस्त ठेवून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र जिल्ह्यात बंदोबस्ताची पाहणी करून कोरोना संक्रमण थोपवण्यासाठी मोलाचे कार्य केले. सध्याच्या काळात रुग्णांना बेडची भासणारी कमतरता पाहून व पोलिस कर्मचार्‍यांची कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता फक्त पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सातारमध्ये 80 बेडचे अद्यावत कोवीड सेंटर उभारले व सुरू केले. जिल्ह्यातील पोलीस बांधवांच्या आरोग्या करिता जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा हा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग असावा अशा या कर्तव्यदक्ष सातारच्या जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचाही कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. 


या सर्व कोरोना योध्यांचा त्यांच्या कार्यालयात जावून त्यांचा सन्मान वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन च्या सातारा टीमने केला आहे.WMO या संघटनेचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. सध्याच्या या कोरोनाच्या संकटमय काळात त्यांनी अनेक रुग्णांना मदत केली आहे. समाजात त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


 


• ब्रेकिंग बातम्या मोबाईल वर वाचण्यासाठी आम्हाला 9545209393 या नंबरला Whatsapp करा आणि लिहा "krishnakath News"