कोरोना महामारीच्या संकटात देवदुत ठरलेले कोरोना योद्धे डाॕ.सुरेश सुकरे यांचा साळशिरंबे गावातील लोकांनी केला नागरी सत्कार.


कोरोना महामारीच्या संकटात देवदुत ठरलेले कोरोना योद्धे डाॕ.सुरेश सुकरे यांचा साळशिरंबे गावातील लोकांनी केला नागरी सत्कार.       


 


उंडाळे दि : कोरोना सारख्या माहामारी रोगाच्या संकटातही अखंडीत पण २४ तास सेवा देणारे डाॕ .म्हणून श्री सुरेश सुकरे (तात्या ) यांची ओळख आज उंडाळे भागातील डोंगर कपारीत झाली आहे. मुळ नांदगाव तालुका कराड गावचे रहिवाशी असलेले डाॕ.सुरेश सुकरे यांनी साधारणपणे २५ /३० वर्षापूर्वी साळशिरंबे येथे आपला एक छोटासा दवाखाना सुरु केला...आज त्याठिकाणी छोटया रोपटाचं च मोठया वटवृक्षात रुपांतर होऊन साळशिरंबे गावा बरोबरच त्या भागातील जिंती ,आकाईवाडी महारुगडेवाडी गावातील नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ होत आहे. ....सध्याच्या वाढत्या कोरोनाच्या महामारीत तर येवती , येणपेपासुन ते उंडाळे पर्यंतच्या सर्व गावातील वाडी वस्ती वरील आजारी असणारे नागरिक उपचारासाठी साळशिरंबे येथील ओपीडीत किंवा दिवसभर नांदगाव मधील त्यांच्या राहत्या घरी असलेल्या मोठया हाॕस्पिटल मध्ये येत असतात ...आजच्या या कोरोना सारख्या आजारात अनेक डाॕक्टर ही या आजाराला बळी पडलेले दिसतात. 


सुरूवातीच्या काळात त्या भागात जेव्हा कोरोनाचा पेशंट सापडलेला तेव्हा इतर डाॕक्टरांच्या प्रमाणे डाॕ.सुरेश सुकरे यांना ही कोरोना चाचणी ला सामोरे जावं लागले होते पण दैवयोगाने त्यावेळी त्यांची चाचणी निगेटिव्ह आली होती ...एवढ होऊन ही डाॕ.सुरेश सुकरे तात्या लोकांची सेवा करणेस थांबले नाहीत त्यांनी आपली सेवा कायम सुरु ठेवली ....याच त्यांच्या अखंडीतपणे करत असलेल्या लोकांच्या सेवेची दखल घेऊन साळशिरंबे गावातील नागरिकांनी त्यांचा मानाचा फेटा गुंडाळून व शाल श्रीफळ देऊन त्यांचा छोट्यासा स्वरूपात सत्कार केला.


  कराड काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते व साळशिरंबे गावाचे नेते पै.तानाजी चवरे यांनी डाॕ.सुरेश सुकरे यांचा सत्कार करण्याचा योग घडवुन आणल्याबद्दल गावातील नागरिकांनी ही समाधान व्यक्त केले. पै.तानाजी चवरे यांनी डाॕ .सुकरे तात्या हे आज आपल्या भागासाठी खरे देवदुत ठरत आहे ते ज्या धाडसानं त्यांच्याकडे येणाऱ्या पेशंट ना तपासणी करुन योग्य ते औषध उपचार करत आहेत म्हणून तर आज गोरगरीब लोक कमी खर्चात कोरोनासारख्या महा भयंकर आजारपण च्या भितीने घाबरुन न जाता डाँ .सुकरे तात्या यांचेकडे जाऊन छोटया मोठया आजारातुन मुक्त होत आहेत .या डोंगरी भागात तात्यांचे फार मोठे योगदान आहे.   


  यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ सुकरे म्हणाले नांदगाव माझी जन्मभुमी असली तरी साळशिरंबे माझी कर्मभुमी आहे. साळशिरंबे गाव हे माझंच गाव आहे असं मी नेहमीच मानतो. या गावात मी गेली २५ वर्षापूर्वी पासुन आरोग्य सेवा करतो मला या गावानं खुप काही दिलं आहे. माझ उरलेलं आयुष्य ही मी याच गावात सेवा करत घालवणार आहे. लोकांची आरोग्य सेवा करण्यातच माझा आनंद आहे. आज तुम्ही केलेल्या सन्मानाने खरंच माझ मन भरुन आले आहे .हा आज चा दिवस मी आयुष्यभर विसरणार नाही मी माझी सेवा अखंडीतपणे सुरु ठेवणार आहे. आठवडयातुन एक सुट्टीचा दिवस असतो शनिवार त्या दिवशी ही मी आता दवाखाना सुरु ठेवणार आहे २४ तास लोकांची सेवा करत राहणे हा मी निश्चय केला आहे.   


  या वेळी त्यांनी गावातील प्रशासकीय अधिकारी ग्रामसेवक श्री .चव्हाण व प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवीका तसेच आशा वर्कर, पोलीस पाटील यांचे ते करत असलेल्या कामाचे कौतुक ही केलं   


यावेळी गावचे सरपंच पै.तात्या पाटील, कुस्ती संघटक पै.तानाजी चवरे, माजी.पं.सं सदस्य तुकाराम पाटील, ग्रा.पं.सदस्य सुरेश पाटील धनाजी पाटील सौ,उमा पाटील (पोलीस पाटील) ग्रामसेवक,तसेच अभिलाश पाटील, संतोष जाधव आबासो चवरे, तंटामुक्ती अध्यक्ष रमेश पाटील, सुनिल चवरे, तानाजी साठे, प्रविण पाटील, धनाजी चवरे, किरण चवरे, महेश पाटील(पेंटर) आबासो शेंडगे, शरद साळुंखे, वैभव चवरे ग्रा.प.कर्मचारी महादेव शिंदे व अजित साळुंखे तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.