पत्रकार पांडूरंग रायकर यांना पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांचेकडून अशीही आदरांजली


पत्रकार पांडूरंग रायकर यांना पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांचेकडून अशीही आदरांजली


तळमावले/वार्ताहर


टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीचे पत्रकार पांडूरंग रायकर यांचे नुकतेच निधन झाले. प्रत्यक्ष आणि सोशल मिडीयावर त्यांच्या आकस्मिक निधनाबाबत दुःख व्यक्त केले जात आहे. पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनाही रायकर यांच्या निधनाचे दुःख झालेे. पत्रकार पांडूरंग रायकर यांचे व्यक्तिचित्र रेखाटून डाकवे यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे. एका पत्रकाराकडून दुसर्‍या पत्रकाराला दिलेली ही अनोखी आणि आगळीवेगळी आदरांजली मानावी लागेल.


कोरोनाच्या काळात पांडूरंग रायकर यांनी केलेली पत्रकारिता कौतुकास्पद आहे. आतापर्यंत त्यांनी केलेली कामगिरी अतुलनीय अशीच आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने पत्रकारितेतील एक उमदा पत्रकार हरपला आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकार व संपूर्ण समाजमन हळहळले आहे. संवेदनशील मनाचे पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी पत्रकार रायकर यांचे व्यक्तिचित्र रेखाटत त्यांच्याप्रती आदरांजली व्यक्त केली आहे.


पत्रकार डाॅ.डाकवे यांनी पांडूरंग रायकर यांच्या श्रध्दांजलीपर रेखाटलेल्या व्यक्तिचित्रणाची बातमी टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीवर शुक्रवार दि.4 सप्टेंबर व शनिवार दि.5 सप्टेंबर, 2020 रोजी ‘36 जिल्हे 72 बातम्या’ या कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आली आहे. पत्रकार दिनकर थोरात व संतोष नलावडे यांनी याकामी विशेष सहकार्य पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांना केले आहे.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


यापूर्वी पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळषास्त्री जांभेकर, संत गाडगेबाबा, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण, कर्मवीर भाऊराव पाटील, माजी उपमुख्यमंत्री स्व.आर.आर.पाटील (आबा) यांची जयंतीनिमित्त रेखाचित्रे, शब्दचित्रे, रांगोळी, पेंटींग रेखाटून त्यांना आदरांजली वाहिली आहे.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖