कर्मवीरांना अभिवादन: अक्षरमित्र डाॅ.संदीप डाकवे यांचा उपक्रम. पोस्टकार्डावर उतरवले 133 वेळा कर्मवीर


कर्मवीरांना अभिवादन: अक्षरमित्र डाॅ.संदीप डाकवे यांचा उपक्रम


पोस्टकार्डावर उतरवले 133 वेळा कर्मवीर


तळमावले/वार्ताहर


‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ असा मूलमंत्र देत संपूर्ण महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात शिक्षणाची गंगोत्री पोहोचवणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांची 133 वी जयंती साजरी होत आहे.


133 व्या जयंतीचे औचित्य साधून पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड होल्डर, हायरेंज बुक आॅफ वल्र्ड रेकाॅर्ड होल्डर युवा चित्रकार, पत्रकार, अक्षरमित्र डाॅ.संदीप डाकवे यांनी कर्मवीरांना अनोख्या पध्दतीने अभिवादन केले आहे.


भाऊराव पाटील (आण्णा) यांना ‘कर्मवीर’ ही उपाधी दिली आहे. ‘कर्मवीर’ हे शब्द डाॅ.संदीप डाकवे यांनी एका पोस्टकार्डावर 133 वेळा सुंदर अक्षरात लिहून कर्मवीरांना अभिवादन केले आहे. तसेच पत्राच्या वरच्या डाव्या बाजूला 22.09.2020 ही तारीख तर दोन्ही बाजूला ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’, हे वाक्य लिहले आहे. पत्राच्या शेवटी पद्मभूषण डाॅ.कर्मवीर भाऊराव पाटील यांना 133 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन असे लिहले आहे. पाठीमागील बाजूला ‘रयत’ ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ या शब्दात रयत शिक्षण संस्थेचे बोध चिन्ह असलेले वडाचे चित्र मोठया कौशल्यपूर्वक रेखाटले आहे.


पोस्टकार्डाच्या काही सेंटीमीटरच्या आकारात 133 वेळा कर्मवीर लिहून अभिवादन करणारे बहुधा ते राज्यातील एकमेव असतील. येत्या 22 सप्टेंबरला पद्मभूषण डाॅ.कर्मवीर भाऊराव पाटील (आण्णा) यांची 133 वी जयंती साजरी होत आहे. त्या अनुषंगाने आपणही त्यांना अनोख्या पध्दतीने अभिवादन करावे या भावनेतून हा उपक्रम राबवला असल्याचे अक्षरमित्र डाॅ.संदीप डाकवे यांनी सांगितले आहे.


 या अनोख्या उपक्रमासाठी कलाशिक्षक जयंत कदम, बाळासाहेब कचरे, भरत कुंभार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


यापूर्वी अक्षरमित्र डाॅ.संदीप डाकवे यांनी ‘कर्मवीर’, ‘रयत’, ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’, ‘आण्णा’ अशा शब्दांमध्ये कर्मवीर आण्णांची आकर्षक आणि प्रमाणबध्द रेखाचित्रे चितारली आहेत. तसेच रांगोळी, पेंटींग यामधून देखील कर्मवीरांची चित्रे रेखाटत त्यांना अभिवादन केले आहे.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖