सातारा जिल्ह्यातील 'हे' गाव यावर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणार नाही.


बनपुरी गावात सन २०२० मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा गावातील सर्व गणेश मंडळांच निर्णय 


बनपुरी / प्रमोद पाटील 


         बनपुरी ता पाटण येथील सर्व गणेश मंडळाच्या सदस्यांच्या उपस्थिती मध्ये ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे साहयक निरीक्षक उत्तमराव भजनावळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत बनपुरी येथे मिटींग झाली यामध्ये सर्वाच्या एक मताने चालू वर्षी कोरोना सारख्या जागतिक महामारी सारख्या आजारामुळे प्रशासनाने व ग्रामपंचायत बनपुरी ने केलेल्या आवाहनाला  प्रतिसाद देत गावच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व मंडळानी बनपुरी गावामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे


     यावेळी बनपुरी गावचे सरपंच सौ नर्मदा कुंभार, उपसरपंच शिवाजीराव पवार,तंटामुक्ती चे अध्यक्ष शिवाजीराव जगदाळे, माजी सरपंच संपतराव पाटील, पोलीस पाटील दत्तात्रय कुंभार, प्रमोद पाटील, शिवाजीराव पाटील, अशोक पाटील, दादासो देसाई, विनायक लटके, ग्रामसेवक तानाजीराव जाधवर, गावातील १४ गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते