कुंभारगांव मध्ये "एक गाव एक गणपती" चा निर्णय.


कुंभारगांव मध्ये "एक गाव एक गणपती" चा निर्णय. 


कुंभारगाव दि. (प्रतिनिधी) पाटण तालुक्यातील कुंभारगाव ग्रामपंचायत ही मोठी ग्रामपंचायत आहे. सामाजिक, राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या या ग्रामपंचायतीने शासनाच्या "एक गाव एक गणपती" या आवाहनास प्रतिसाद देत येणाऱ्या गणेशोत्सवात गावात एकाच सार्वजनिक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना होईल असा एकमुखी निर्णय घेतला या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ढेबेवाडी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तमराव भजनावळे यांच्या अध्यक्षतेखाली येथील ग्रामपंचायत कार्यालयात सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली. या बैठकीत सर्व पक्षाचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. अर्चना वरेकर उपसरपंच, राजेंद्र पाटील ग्रामसेवक अनिल जाधव, सर्व सदस्य, पोलिस पाटील अमित शिंदे, प्रवीण मोरे तसेच सर्व सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते.


 सध्या राज्यावर कोरोना चे महाभयानक संकट उभे ठाकले आहे. सार्वजनिक कार्यक्रमात कोरोना चा संसर्ग होण्याची भीती असते त्यामुळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात एकच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करावा व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन या बैठकीत ढेबेवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तमराव भजनावळे यांनी केले. या आवाहनास प्रतिसाद देत सर्व बैठकीत उपस्थित असणारे सदस्यांनी "एक गाव एक गणपती" या उपक्रमास एक मुखी मंजुरी दिली व या उपक्रमाचे स्वागत केले.