महिंद धरण सांडव्याची भिंत कोसळली.


महिंद धरण सांडव्याची भिंत कोसळली.


ढेबेवाडी / प्रतिनिधी


उत्तर वांग नदीवर असलेल्या महिंद धरणाच्या सांडव्याच्या सुरक्षिततेसाठी सणबूर-बोर्गेवाडी रस्त्याला समांतर लाखो रूपये खर्चून बांधलेली संरक्षक भिंत चालू पावसात कोसळल्याने बोर्गेवाडी -सणबूर रस्त्यावरील वाहतुक बंद पडली आहे. यामुळे भिंतीच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या निकृष्ट बांधकामाची चौकशी करून या भिंतीचे काम तातडीने करा अशी मागणी गौतम यादव प्रतिष्ठान संचलीत महिंद प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष चिंतामण यादव यांनी केली आहे.


        याबाबत मिळालेल्या माहितीनुसार उत्तर वांग नदिवर महिंद येथे एक टी.एम.सी क्षमतेचे धरण बांधण्यात आले आहे.धरणाच्या दक्षिणेकडून धरणाचा सांडवा काढण्यात आला आहे तर सांडवा आणि सणबूरमार्गे बोर्गैवाडीकडे जाणारा रस्ता आहे.पाऊस महापुर अशा कारणाने जमिन वा दरडी कोसळून धरणाकडे सरकू नये म्हणून सांडवा आणि रस्त्याला संरक्षण म्हणून समांतर दगडी भिंत बांधली होती.या धरणाची भिंत संरक्षण भिंत म्हणजे त्याच प्रमाणे मजबूती असणे महत्त्वाचे असते पण ही भिंत मात्र कमकुवत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.


    धरणाची मुख्य भिंत सुद्धा कमकुव झाली होती म्हणून लक्षावधी रूपये खर्चून तिथे पुन्हा जँकेटिंगचे काम नुकतेच करून घेतले आहे. म्हणजेच त्या कामावर सुद्धा निकृष्टतेचा संशय घेतला जात होता.नव्या जँकेटिंगचे काम सुरु असताना आम्ही आंदोलन सुद्धा केले होते. धरणाची आणि त्याला पुरक बांधकामे किमान पुढच्या 100 वर्षाचा विचार करून मजबुती व गुणवत्ते कडे लक्ष देऊनच होणे अपेक्षित असतांना 15/20 वर्षातच जर अशी कामे कमकुवत वा ढासळणार असतील धरणे, भिंती,आणि जनतेच्या सुरक्षिततेचे काय असा प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे.


                प्रकल्पाखालील बाधित धरणग्रस्त समितीच्या मते सदर भिंत प्रकल्पाचा सांडवा आणि आणि सणबूर रस्त्याच्या संरक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन बांधली आहे म्हणजेच धरणाची सुरक्षितता लक्षात घेऊनच काम केले असावे तरीही ती 15/20 वर्षाच्या आत कोसळते यावरून भिंतीचे काम अंदाज पत्रका प्रमाणे झालेले नाही ते निकृष्ट दर्जाचे झाले आहे हे स्पष्ट होते.


      25 वर्षापूर्वी धरण बांधले पण आजअखेर बाधित धरणग्रस्तां पैकी 25 धरणग्रस्तांचे सुद्धां परिपुर्ण पुनर्वसन झाले नाहीआजही धरणग्रस्त वाऱ्यावरच आहेत.पुनर्वसन डावलून कायदा पायदळी तुडविण्याचा प्रकार आहे असे ना शासनाला वाटत ना प्रशासनाला. धरणाचे काम लाखो रूपये खर्चून निकृष्ट का होईना पण दुसऱ्यांदा केले मात्र पुनर्वसन पुनर्वसन प्रक्रिये कडे लक्ष दिले पाहिजे असे शासन वा प्रशासन व कुणालाच वाटत नाही यापेक्षा जनतेचे दुर्देव वेगळे कायअसू शकते असा प्रश्न धरणग्रस्तांनी उपस्थित केला आहे.त्या बरोबरच या भिंतीचे बांधकाम तातडीने करून रस्ता तातडीने वाहतूकीला खुला करावा अशी मागणी ग्रामस्थ व धरणग्रस्तांनी केली आहे.