तारळी नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना.


तारळी नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना


  सातारा दि. 12 (जिमाका) : तारळी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून धरणामधील पाणीसाठा सांडव्यावरुन वाहण्याच्या पातळीपर्यंत पोहोचण्याच्या स्थितीत आहे. दि. 12 ऑगस्ट रोजी सकाळी 8.00 वाजता एकूण पाणीसाठा 71.25 टक्के झालेला असुन पाणीपातळी 702.15मी. आहे. धरणामधील पाणीसाठा सांडव्या पातळीपर्यंत (म्हणजेच 706.30 मी.) पोहोचल्यानंतर कोणत्याही क्षणी सुमारे 2000 क्युसेक्स इतका विसर्ग नदीपात्रामध्ये सुरु होणार आहे. परिणामी धरणाच्या खालील बाजूस तारळी नदीमधील पात्रात पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. अशी स्थिती येथुन पुढे पर्जन्य कालावधीमध्ये केव्हाही निर्माण होऊ शकते. त्यामुळे तारळी नदीकाठ लगत असलेल्या गावांतील ग्रामस्थांनी नदीपात्रामध्ये जाऊ नये. तसेच नदीकाठालगत असलेल्या इलेक्ट्रिक मोटारी, डिझेल इंजिन अथवा तत्सम सामुग्री आणि पशुधन सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता कण्हेर कालवा विभाग क्र. 2, करवडी (कराड) यांनी दिल्या आहेत. 


 


Popular posts
कोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय!
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
तुकाराम गुरव यांचे दुःखद निधन
इमेज
श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.
इमेज
शैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.
इमेज