कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मारुल हवेली पुन्हा लॉकडाऊन


कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मारुल हवेली पुन्हा लॉकडाऊन. 


पाटण, दि 16 (प्रतिनिधी) 


मारुल हवेली ता पाटण गावात कोरोना रुग्णाची संख्या वाढत असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे परिसरातील गावासाठी हे बाजारपेठेचे हे गाव असल्याने अनेक गावांचा या ना त्या कारणाने नेहमी संपर्क असतो त्यामुळे कोरोना साखळी तोडण्यासाठी गावात 15 ते 20 ऑगस्ट असा पाच दिवसांचा लॉकडाउन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे        


मारूल हवेली हे गाव परिसरातील कोरिवळे, टेळेवाडी, गारवडे, बहुले, दिवशी बुद्रुक, पापर्डे, सोनाईचीवाडी, नावडी या गावासाठी बाजारपेठेचे प्रमुख गाव आहे गावात मेडिकल, दवाखाने, खताची दुकाने, बँक या कामासाठी परिसरातील गावांची मारुल हवेलीला वर्दळ असते मारुल हवेली गावात या पूर्वी कोरोनाचा शिरकाव होऊ दिला नाही परंतु दुर्देवाने गेल्या काही दिवसात येथे झपाट्याने कोरोना रुग्णाची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे या पार्शवभूमीवर कोरोनाची साखळी तोडणे गरजेचे असून मारूल हवेली गावातील जनतेचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी दिनांक 15 ते 20 ऑगस्ट या कालावधीत मारूल हवेली गावात कडक लॉकडाऊन घेतला जाणार आहे. यात केवळ मेडिकल , दवाखाने सकाळी 09ते दुपारी 02वाजेपर्यंत चालू राहतील. बाकी सर्व दुकानें बंद राहतील त्यामुळे अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली होणारा वावरही होणार नाही यांची दक्षता घेतली जाणार आहे. तर कायदेशीर बाबीचे नियम, र्निबध याचे उल्लंघन केल्यास संबधीतावर त्या त्या विभागाकडून कडक कारवाई केली जाणार आहे, असे सरपंच अशोक मगरे यांनी सांगितले


Popular posts
मोरेवाडी ता पाटण येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिर जीर्णोद्धार व 15 व्या वर्धापन वर्षारंभ निमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन.
इमेज
कोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय!
इमेज
तुकाराम गुरव यांचे दुःखद निधन
इमेज
पाटण तालुक्यातील विकास कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
इमेज
मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी पदी घोणशीची ऐश्वर्या गुरवची निवड.खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सत्कार.
इमेज