१३ दानशूरांची १६ गरीब व गरजू विद्यार्थ्यांना अँड्रॉइड मोबाईलची मदत.

 



दिवशी बुद्रुक : विद्यार्थ्यांना मोबाईल वितरण करताना शिवाजी ढवळे


पाटण / प्रतिनिधी (भगवंत लोहार ) 


कोरोनामुळे सध्या शाळा बंद असून ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य दिले जात आहे मात्र ग्रामीण भागात आजही अनेकांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्याने शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे पाटण तालुक्यातील दिवशी बुद्रुक गावातील 16 गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी गावातील ग्रामस्थ देवदूत ठरले असून त्यांनी या वंचित विद्यार्थ्यांना मोबाइल देऊन त्यांच्या घरी मोबाईल रुपी ज्ञानगंगा पोहचविण्याचे काम केले आहे त्यांच्या या दातृत्वाचे कौतुक होत आहे


दिवशी बुद्रुक हे दुर्गम आणि डोंगराळ गाव, चारी बाजूंनी डोंगराचा वेढा असणाऱ्या या गावात भौतिक सुविधा तशा कमीच, गावातील जनतेसाठी शेती हे प्रमुख साधन असले तरी पाण्याअभावी शेती गैरसोयीचे त्यामुळे दुग्ध व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारी अनेक कुटुंबे या गावात आहेत पूर्वी गावातील शिक्षणाचा प्रवाह सातवीच्या पुढे थांबत होते गावात शिक्षणाची सोय नसल्याने मुली इच्छा असूनही शिकू शकत नव्हत्या सुमारे तीस वर्षांपूर्वी गावात रयत शिक्षण संस्थेची भागशाळा सुरू झाली आणि उच्च शिक्षितांची संख्या वाढू लागली हा शिक्षणाचा प्रवाह अद्याप अखंड सुरू आहे 


यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे शैक्षणिक वर्ष सुरू होऊ शकले नाही त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय पुढे आला आहे मोबाईल वरून अभ्यास पाठवून तो सोडऊन घेतला जात आहे ऑनलाईन अभ्यास सुरू झाला असला तरी त्यासाठी फक्त मोबाईल नव्हे तर अँड्रॉइड मोबाईल असणे आवश्यक आहे ज्यांचे कडे असे मोबाईल आहेत त्यांचा अभ्यास सुरू आहे मात्र ज्यांच्या कडे नाही त्यांचे काय हा प्रश्न निर्माण होत आहे असा विचार गावातील प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन उच्च पदस्थ काम करणारे शिवाजी ढवळे यांच्या डोक्यात आला आणि त्यांनी दोन मोबाईल देण्याची तयारी दाखवत गरजू विद्यार्थ्यांची माहिती मागविली गरजूंची माहिती काढताना असे 16 विद्यार्थी समोर आले मग एकाचे दोन करीत 13 दानशूर पुढे आले आणि या 13 जणांच्या दातृत्वातून 16 विद्यार्थ्यांच्या घरी मोबाईल रुपी ज्ञान गंगा पोहचली विशेष म्हणजे यातील बहुतांश देणगीदार हे प्रतिकूल परिस्थितीत पायपीट करून आणि अनंत अडचणींचा सामना करून शिक्षण घेऊन उच्च पदावर पोहचलेले आहेत 


या मोबाईलचे वितरण दिवशी बुद्रुक येथील ग्रामपंचायत सभागृहात करण्यात आले यावेळी शिवाजी ढवळे, ठक्कर बाप्पा विद्यालयाचे प्राचार्य डी जी नांगरे, सरपंच संजय थोरात, माजी सरपंच आबासाहेब पाटील, जे बी सूर्यवंशी, डी सी पाटणकर, विष्णू सूर्यवंशी, उत्तम साळुंखे, एम ए सूर्यवंशी, चंद्रकांत सूर्यवंशी, गंगाराम कुंभार, शैलेश कुंभार, प्रदीप थोरात, भिकाजी पवार, हिरालाल कांबळे, रघुनाथ कांबळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण ऑनलाइन झाल्याने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना अँड्रॉइड मोबाईल विकत घेणे त्यांच्या पालकांना परवडण्यासारखे नव्हते अशावेळी दिवशी बुद्रुक ता पाटण या गावातील१३ दानशूर व्यक्तींनी एकत्र येऊन आपल्या गावातील १६ गरीब व गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक असे सोळा अँड्रॉइड मोबाइल ची मदत केली यामुळे हे सोळा गरीब व गरजू विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहात आले.व ऑनलाइन शिक्षणाची गंगा या विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचण्यास खूप मोठी मदत झाली. या दानशूर व सामाजिक बांधिलकी असणाऱ्या व्यक्तींचे सर्वत्र कौतुक होत आहे.


मोबाईल देणगीदार


शिवाजी ढवळे, विजय कारंडे, तुकाराम थोरात, शाम कुंभार, के एन कुंभार, मारुती कांबळे, प्रदीप सूर्यवंशी, बी जे पवार, अरुण सावंत, शरद सूर्यवंशी, चंद्रकांत सूर्यवंशी, वसंत पाटील


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖