मर्चंट सिंडीकेट पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव.


मर्चंट सिंडिकेट ग्रा.बि.शेती सह. क्रेडिट संस्था मर्या;तळमावले संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न.


 तळमावले/प्रतिनिधी 


               तळमावले पंचक्रोशीतील इयत्ता दहावी मध्ये शिकणाऱ्या एसएससी मार्च 2020 परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार मर्चंट सिंडिकेट पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन अनिल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला सामाजिक बांधिलकी जपत संस्थेच्या वतीने विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन नेहमीच करण्यात येते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखत, आरोग्य विषयक नियम पाळत, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत  जंगानी यांनी केले, तर संस्थेच्या विधायक कार्याचे कौतुक सुभेदार शिवाजीराव कदम यांनी केले. यावेळी तळमावले विभागातील विविध विद्यालयातील बारा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संचालक प्रकाश शामराव देसाई, महेश हरिभाऊ कोकाटे, लक्ष्मण मारुती मत्रे,ताईगडे सर, शरद शिंदे , ओमकार शिंदे आदींसह शिक्षक पालक व विद्यार्थी उपस्थित होते.