आईवडिलांच्या हस्ते ‘दीप उजळतो आहे’ या फोटोबायोग्राफी पुस्तकाचे प्रकाशन


आईवडिलांच्या हस्ते ‘दीप उजळतो आहे’ या फोटोबायोग्राफी पुस्तकाचे प्रकाशन


तळमावले/वार्ताहर


गणेशचतुर्थीच्या शुभमुर्हूतावर डाॅ.संदीप डाकवे यांच्या फोटोबायोग्राफी पुस्तकाचे प्रकाशन त्यांची आई सौ.गयाबाई डाकवे, वडील श्री.राजाराम डाकवे (तात्या), पत्नी सौ.रेश्मा डाकवे, चि. स्पंदन डाकवे, कु.पौर्णिमा डाकवे, प्रथमेश डाकवे यांच्या हस्ते उत्साहात पार पाडले. पुस्तक प्रकाशनाचा मान आई वडील व कुटूंबियांना दिल्यामुळे सर्वजण भारावून गेले.


घरगुती वातावरणात हा सोहळा पार पडला. डाॅ.संदीप डाकवे यांचा आतापर्यंतचा जीवनप्रवास या पुस्तकात फक्त फोटोच्या साहय्याने दर्शवण्यात आला आहे. या पुस्तकाची संकल्पना, मांडणी आणि रचना स्पंदन अॅडव्र्हटायझींग यांच्या वतीने करण्यात आली आहे. स्पंदन प्रकाशनाच्यावतीने सदर पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. डाॅ.संदीप डाकवे यांचे हे तिसरे पुस्तक असून पहिले पुस्तक माजी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, ना.शंभूराज देसाई व अन्य मान्यवर यांच्या हस्ते झाले तर दुसरे पुस्तक प्रकाशन पद्मश्री नीलकंठ खाडीलकर (भाऊ), शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे व अन्य मान्यवर यांच्या हस्ते डाॅ.संदीप डाकवे यांच्या वाढदिनी झाले होते. तर आताच्या ‘दीप उजळतो आहे’ या फोटोबायोग्राफी पुस्तकाचे प्रकाशन गणरायाच्या साक्षीने आई वडीलांच्या हस्ते करण्यात आले.


या निमित्ताने एक आगळावेगळा सोहळा डाकवे कुटूंबियांनी अनुभवला आहे. अत्यंत भारावलेल्या आणि रोमांचकारी वातावरणात हा कार्यक्रम झाला. आई वडिल आणि माझा संपूर्ण परिवार यांच्या संस्कारामुळे, मार्गदर्शनामुळे, सहकार्यामुळे आज मी आयुष्यात काहीतरी प्रगती करुन शकलो आहे. त्यामुळे त्यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. अशी भावनिक प्रतिक्रिया डाॅ.संदीप डाकवे यांनी यावेळी दिली आहे.