काजारवाडी खळे येथील महिला हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल.


काजारवाडी खळे येथील महिला हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल.


तळमावले दि.


काजारवाडी (खळे) तालुका पाटण येथील 65 वर्षीय महिला हिराबाई तानाजी काजारी शुक्रवार दि.७/८/२० रोजी संध्याकाळपासून हरवल्याची तक्रार त्यांचा मुलगा अजय तानाजी काजारी यांनी ढेबेवाडी पोलिसात दिली आहे. 


याबाबत सविस्तर वृत्त असे की हिराबाई काजारी त्यांच्या खडकळी नावाच्या शिवारात शुक्रवारी सायंकाळी ५:३०च्या सुमारास भाजी आणण्यासाठी गेल्या होत्या त्या पुन्हा लवकर परत आल्या नाहीत म्हणून त्यांच्या घरातील लोकांनी सर्वत्र शोधाशोध केली मात्र त्या कुठेही आढळून आल्या नाहीत. त्यांचा नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला मात्र त्या कुठेही सापडल्या नाहीत. शेवटी काल दुपारी त्यांच्या मुलाने आई हरवल्याची तक्रार ढेबेवाडी पोलिसात दाखल केली. 


हरवलेल्या महिलेचे वर्णन असे वय 65 वर्षे, उंची पाच फुट दोन इंच, रंग गोरा, चेहरा गोल, डोळे काळे, अंगाने मध्यम, केस काळे पांढरे, उजव्या हातावर दादा हिराबाई अशी नावे गोंदवली आहेत . अंगावर हिरव्या रंगाची साडी व हिरव्या रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे. गळ्यात मंगळसूत्र आहे. अशा वर्णनाची महिला कुणाला दिसल्यास ढेबेवाडी पोलिसात माहिती कळवावी. अधिक तपास ढेबेवाडी पोलीस करत आहेत. 


सदर वर्णनाची महिला कुठे आढळून आल्यास खालील मोबाईल नंबरशीही संपर्क साधण्याचे आवाहन अजय काजारी यांनी केले आहे.


 74003 68028


 77989 29283


 93244 61372


 86524 75057


77985 41517