नांदलापूर वॉटर ए.टी.एम. चे भूमिपूजन अशोकराव थोरात यांचे शुभहस्ते संपन्न.


नांदलापूर वॉटर ए.टी.एम. चे भूमिपूजन अशोकराव थोरात यांचे शुभहस्ते संपन्न.


कराड / प्रतिनिधी      


जनसुविधा फंडातून शिर्के वस्ती येथील रस्त्याचे भूमिपूजन तसेच ग्रामनिधीतून वॉटर ए.टी.एम. कामाचा भूमिपूजन समारंभ नुकताच नांदलापूर येथे संपन्न झाला. श्री मळाई ग्रुपचे प्रमुख,शेती मित्र मा. श्री अशोकराव थोरात यांचे शुभ हस्ते, नांदलापूर ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा समारंभ संपन्न झाला.


      भूमिपूजन प्रसंगी अशोकराव थोरात ग्रामस्थांना उद्देशून म्हणाले,नांदलापूर ग्रामस्थांच्या मूलभूत सुविधा पूर्ण करण्याच्या उद्देशाने नांदलापूर ग्रामपंचायत सरपंच सौ शशिकला शिर्के व उपसरपंच रमेश शिर्के यांचे अथक प्रयत्नातून विकासकामे सुरू आहेत. त्यांना श्री मळाई ग्रुपचे संपूर्ण सहकार्य राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.


    या कार्यक्रमासाठी अजित थोरात, नगरसेवक मलकापूर, योगेश पारवे-ग्रामसेवक नांदलापूर, शामराव शिर्के,तुळशीराम शिर्के ,अण्णा गोविंद शिर्के, दिलीप शिर्के ,विश्वासराव निकम, सुरज घाडगे, सुरेश शिर्के,अनिल शिर्के, नंदकुमार शिर्के, दत्तात्रय कुंभार, जयवंत लावंड,विजय येडगे,सुरेश जाधव, एम. पी. फराळे इतर मान्यवर ग्रामस्थ यांचे उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. श्री शेखर शिर्के यांनी उपस्थित मान्यवर ग्रामस्थांचे आभार मानले.


Popular posts
कोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय!
इमेज
तुकाराम गुरव यांचे दुःखद निधन
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.
इमेज
शैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.
इमेज