साताऱ्यात जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटर लवकरच सुरू होणार: गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई. मुख्यमंत्री यांनी दिली तात्काळ मान्यता


साताऱ्याला जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटर सुरु करण्याकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केली आज मुख्यमंत्री, नगरविकासमंत्री व राज्याचे मुख्य सचिवांशी दुरध्वनीवरुन चर्चा.


मुख्यमंत्री यांनी यास तात्काळ मान्यता देत साताऱ्याला जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटर सुरु करण्याचे केले आदेश.


सातारा दि. ३०:- सातारा जिल्हयामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेदिवंस वाढ होत असून कोरोना रुग्णांना उपचाराकरीता जिल्हयाच्या ठिकाणी जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटरची गरज पहाता लवकरात लवकर साताऱ्यात २०० ऑक्सीजन बेड व ५० व्हेन्टिलेटर सुविधांचे जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटर सुरु करणेसंदर्भात आज राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.उध्दवजी ठाकरे, नगरविकास मंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे व राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांचेबरोबर दुरध्वनीवरुन चर्चा केली. राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.उध्दवजी ठाकरे यांनी याचे गांभीर्य व गरज ओळखून तात्काळ यास मान्यता देत राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांना साताऱ्यात २०० ऑक्सीजन बेड व ५० व्हेन्टिलेटर सुविधांचे जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटर उभारण्यास सुरुवात करण्याचे आदेश दिले आहेत.


         गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केलेल्या मागणीनुसार व मा.मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आदेशानुसार साताऱ्यात आता २०० ऑक्सीजन बेड व ५० व्हेन्टिलेटर सुविधांचे जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मा.मुख्यमंत्री यांनी दिलेल्या मान्यतेनुसार जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटर उभारण्याच्या कामांस लवकरात लवकर सुरुवात करावी असे राज्याचे मुख्य सचिवांनी जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांना सुचित केले असून यासंदर्भात गृहराज्यमंत्री ना.देसाईंनीही तात्काळ जिल्हाधिकारी सातारा यांना दुरध्वनी करुन साताऱ्यात २०० ऑक्सीजन बेड व ५० व्हेन्टिलेटर सुविधांचे जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटर उभारण्यास मा.मुख्यमंत्री यांनी मान्यता दिली आहे. पुणे येथे ज्याप्रमाणे जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटर सुरु केले आहे त्याची उद्याच्या उद्या आपण स्वत: जावून पहाणी करुन साताऱ्यातील शिवाजी संग्रहालयाच्या इमारतीच्या परिसरात २०० ऑक्सीजन बेड व ५० व्हेन्टिलेटर सुविधांचे जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटरच्या कामांस सुरुवात करुन १५ दिवसाच्या आत हे सेंटर सुरु होणेसंदर्भात सर्वोत्तोपरी उपाययोजना करण्यात याव्यात असे ना.शंभूराज देसाईंनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना सुचित केले आहे.


Popular posts
मोरेवाडी ता पाटण येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिर जीर्णोद्धार व 15 व्या वर्धापन वर्षारंभ निमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन.
इमेज
कोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय!
इमेज
तुकाराम गुरव यांचे दुःखद निधन
इमेज
पाटण तालुक्यातील विकास कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
इमेज
मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी पदी घोणशीची ऐश्वर्या गुरवची निवड.खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सत्कार.
इमेज