ग्राम पातळीवरील कोरोना कमिटीच खरे कोरोना योद्धे


कुंभारगांव / प्रतिनिधी 


 जागतिक पातळीवरील सर्वांगिण व सर्वव्यापी बनलेल्या कोरोना या जागतिक महामारीने जग धोक्याच्या कड्यावर नेऊन मानवी जीवनाशी खेळ मांडलाआहे. या महामारीला टक्कर देण्यासाठी सर्वच पातळीवर अहोरात्र काळजी घेण्यात अनेक कोरोना योद्धे कार्यरतआहेत. त्यांचा सन्मान व गौरवही होतोय मात्र खेडोपाडी ग्रामीण भागात तळागाळात राहून जनतेच्या जीवनाची काळजी घेणारा खरा कोरोना योद्धा ठरलेला ग्रामसेवक हा घटक धोका समोर दिसत असतानाही आरोग्य यंत्रणा सरपंच, ग्रामपंचायत कर्मचारी,पोलीस पाटील, आशा सेविका,अंगणवाडी सेविकाअसे घटक बरोबर घेऊन थेट जनतेत मिसळून जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महत्त्वाचे काम करीत आहेत यात ढेबेवाडी विभागातली सर्व ग्रामसेवकांनी खरी आघाडी घेतली आहे,हे स्पष्ट झाले आहे,त्यांचा सन्मान होण्याची गरज आहे,मात्र अशा प्रामाणिक योद्ध्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे असे जनतेला वाटते.भले कुणी त्याचा गौरव करो वा न करो पण जनतेला असे वाटते ही ग्रामसेवकांच्या कामाची खरी पोहोच पावती आहे.         


 अनेक आजी माजी पदाधिकाऱ्यांचा राजकीय व सामाजिक क्षेत्राचा जागृत वारसा आणि सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कुंभारगांवच्या कार्यक्षेत्रात सरपंच,उपसरपंच व ग्रामसेवक, आणि कोरोना समिती यांनी जागरूकपणे काम केले तरीही बाहेरून आलेल्या नागरिकांमुळे गावात कोरोनाचा प्रवेश झाला,नंतर निकट सहवासित बाधित झाल्यानेे काही प्रमाणात कोरोना वाढण्याचा धोका निर्माण झाल्यावर पंचायतीने काटेकोर दक्षताआणि कठोर भुमिका घेऊन निर्बंध कडक केले,गावातील होम क्वारंटाईन बाबत कडक भुमिका व सर्व प्रतिबंधक उपाय आमलात आणले तरीही आयसोलेशन मधे सापडलेला अपवाद वगळता येथे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अथक परिश्रम घेतल्या मुळे यश आले, ग्रामसेवक अनिल जाधव या खऱ्या कोरोनायोद्ध्याचा सिंहाचा वाटा आहे असे मत सरपंच सौअर्चना वरेकर व उपसरपंच राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केले आहे.