कॅप्टन अमोल यादव यांनी पाटण तालुक्याचे नाव देशाच्या नकाशावर कोरले. 


कॅप्टन अमोल यादव यांनी पाटण तालुक्याचे नाव देशाच्या नकाशावर कोरले.  


   


सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका हा अतिशय दुर्गम डोंगराळ मागासलेला परंतु महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब ह्याच पाटण तालुक्यात जन्माला आले आणि राजकीय सामाजिक वसा जोपासत आपल्या तल्लख बुध्दीमतेच्या जोरावर आणि तालुक्यातील जणतेच्या पाठबळावर त्यांना अनेक मंञीपदे मिळाली. आणि तेथूनच खऱ्या अर्थाने पाटण तालुक्याचे नंदनवन झाले, त्यांचे पश्चात लोकनेते साहेबांचे नातू उत्कृष्ठ संसदपट्टू नामदार शंभूराज देसाई साहेब यांनी तर पाटण तालुक्यातील एकही गाव विकासाच्या दृष्टीने वंचित ठेवलेले नाही, अशाच प्रकारे तल्लख बुध्दीमतेच्या जोरावर सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील सळवे गावचे सुपूञ कॅप्टन अमोल यादव हे लहान पणापासून ध्येयवेडे व जिद्दी स्वभावाचे असल्याने विमान निर्मिती क्षेञात आपल्या देशाला स्वावलंबी बणवू पाहणाऱ्या कॅप्टन अमोल यादव यांच्या विमानाने चाचणीचा पहीला टप्पा पूर्ण केला आहे. कॅप्टन अमोल यादव यांनी 1998 साली आपल्या (Threast Air Cropt)कंपनीच्या माध्यमातून देशातील पहील्यावहील्या विमान निर्मितीचा प्रयत्न सुरू केला परंतु तो यशस्वी होवू शकला नाही तरी कॅप्टन अमोल यादव खचले नाहीत पुन्हा नव्या जोमाने सन 2003मध्ये दुसऱ्या विमानाची निर्मिती सुरू केली तो देखिल प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही. 


सन 2009साली त्यांनी मुंबई चारकोप येथील घराच्या गच्चीवर सहा आसनी विमान निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू केला विमानाच्या निर्मितीपेक्षा शासकीय अनास्था आणि अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे या विमानाच्या उड्डाणास विलंब लागला आहे. आता या विमानाला लागणाऱ्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत.आणि 2011साली शासनाकडे लेखी अर्ज करून देखिल नागरी हवाई वाहतूक संचालना कडून मान्यता मिळवणेसाठी अनेक वर्षे गेली .दरम्यानच्या काळात 'मेक इन इंडिया 'प्रदर्शनात कॅप्टन अमोल यादव यांनी विमानासह सहभाग घेतला होता .कॅप्टन अमोल यादव यांनी वरील विमान बनिवेणेसाठी शासनाची मदत घेतलेली नाही स्वबळाच्या जोरावर ते शक्य झाले आहे. त्यामुळे आत्तापर्यंत सहा कोटीचा खर्च झाला असून दुसर्या टप्यातील चाचणीसाठी दोन कोटीचा खर्च अपेक्षित आहे लवकरच कॅप्टन अमोल यादव यांचे विमान गगनभरारी झेप घेईल यात तिळमात्र शंका नाही


 कॅप्टन अमोल यादव यांचा पाटण तालुक्यातील जनतेच्या वतीने नागरी सत्कार करण्याचा आमचा मानस आहे.   


 शब्दांकन :आप्पासाहेब मगरे