श्री संतकृपा शिक्षण संस्थेत ध्वजारोहण संपन्न.


श्री संतकृपा डी फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ वैशाली महाडिक ध्वजारोहण करताना.


आपण स्वतःच आपल्या सुरक्षेची ढाल बनूया व, स्वातंत्र्य भारताचे आरोग्यदायी नागरिक बनण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहूया.प्राचार्या :वैशाली महाडिक.


कराड /प्रतिनिधी 


श्री संतकृपा शिक्षण संस्था घोगाव येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. कोरोनाच्या संकटामुळे यावर्षीचा स्वातंत्र्य दिन साधेपणाने व शासनाचे नियम पाळून करण्यात आला.श्री संतकृपा डी फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या वैशाली महाडिक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 


यावेळी श्री संतकृपा इंजिनिअरिंगचे प्राचार्य स्वानंद कुलकर्णी, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या पुष्पा पाटील, इंटरनॅशनल स्कूल च्या प्राचार्या सुप्रिया पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या यावर्षीच्या स्वातंत्र्य दिनावर निश्चितपणे कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे कमीत कमी उपस्थितीत आपल्याला हा ध्वजारोहण सोहळा साजरा करावा लागत आहे.स्वातंत्र्य दिन हा एकता व उत्साहाचा दिवस भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार तसेच अनेक क्रांतिवीरांनी स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यामुळे आपण आज या स्वातंत्र्यात आनंदाने राहत आहोत याचे सतत आपल्याला स्मरण ठेवावे लागेल. सध्या आपल्या देशावर असणाऱ्या कोरोना सारख्या महाभयानक संकटात अतिशय हिमतीने सामना करणारे कोरोना योद्धे डॉक्टर्स, फार्मासिस्ट, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी यांना यानिमित्ताने खरोखर सलाम.


कोरोना मुळे सर्व जगच अस्थिर झाले आहे. हे संक्रमण थांबविण्याकरिता आपण आपल्या वागण्या व सवयीमध्ये काही बदल करावे लागेल जसे की मास्क लावणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे, कोरोना वर मात करण्यासाठी आपण स्वतःच आपल्या सुरक्षेची ढाल बनूया व स्वतंत्र भारताचे सृजनशील, आदर्श तसेच आनंदी व आरोग्यदायी नागरिक बनण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहूया. असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले व स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार सुनीता सुतार यांनी केले.