332 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज


332 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 533 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


                सातारा दि. 28 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 332 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 533 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 


                विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावली तालुक्यातील 8, कराड तालुक्यातील 146, खंडाळा तालुक्यातील 7, खटाव तालुक्यातील 14, कोरेगांव तालुक्यातील 39, महाबळेश्वर तालुक्यातील 3, माण तालुक्यातील 13, पाटण तालुक्यातील 7, फलटण तालुक्यातील 26, सातारा तालुक्यातील 62, वाई तालुक्यातील 7 असे एकूण 332 नागरिकांचा समावेश आहे.


      


533 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


 


          स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 9, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड 66, फलटण 11, कोरेगांव 40, वाई 18, खंडाळा 56, रायगांव 20, पानमळेवाडी 42, मायणी 50, महाबळेश्वर 19, पाटण 18, दहिवडी 52, ढेबेवाडी 28 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड 104 असे एकूण 533 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.


 


Popular posts
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी
इमेज
साताऱ्यात राष्ट्रवादीला सुरुंग, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ शिवसेनेत दाखल.
इमेज
पाटण बाजार समितीच्या सभापतीपदी बाळकृष्ण पाटील तर उपसभापतीपदी विलास गोंडांबे यांची निवड.
इमेज
मान्याचीवाडी गावाने पटकावला पन्नास लाख रुपयांचा माझी वसुंधरा अभियान राज्यस्तरीय पुरस्कार.
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायती तर्फे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.
इमेज