दिवशी बुद्रुक येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील 29 जण निगेटिव्ह.


दिवशी बुद्रुक : अँटीजेन किटद्वारे कोरोना तपासणीसाठी उपस्थित आरोग्य यंत्रणा व ग्रामस्थ


( छायाचित्र : भगवंत लोहार)


पाटण,दि 17 (भगवंत लोहार)


दिवशी बुद्रुक ता पाटण येथे कोरोनाचा रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे दरम्यान रुग्णाच्या संपर्कातील आणखी एक महिला कोरोनाबधित सापडल्याने त्यांच्या संपर्कातील 26 जणांची आणि परिसरातील इतर तीन गावातील 3 जणांची अशी एकूण 29 जणांची तपासणी गावात केल्यानंतर अँटीजन किट तपासणीत या सर्वांचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने आरोग्य विभाग आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला


दिवशी बुद्रुक गावात मरळी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या दिवशी बुद्रुक उपकेंद्राचे आरोग्य कर्मचारी आणि ग्रामपंचायतीने घेतलेल्या काळजीमुळे गावात कोरोनाचा शिरकाव थोपविण्यात चांगले यश आले होते मात्र परंगावाहून आलेल्या व्यक्तींमुळे कोरोनाचा शिरकाव झालाच गावातील दोन जणांना यापूर्वी कोरोनाची बाधा झाली होती मात्र त्यांनी त्यावर मात केली मात्र नंतरच्या काळात तीन महिन्यानंतर गावातील एका ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याने पुन्हा गावाची झोप उडाली त्यात त्यांची बहिणही कोरोना बाधित आल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या संपर्कात आलेल्या 26 जणांची आणि टेळेवाडी, मारुल हवेली व सुर्यवंशिवाडी येथील प्रत्येकी एक आशा 29 जणांची प्राथमिक आरोग्य केंद्र मरळी व उपकेंद्र दिवशी बुद्रुक येथील कर्मचाऱ्यांनी गावातील ग्रामपंचायत कार्यालयात अँटीजेन किट माध्यमातून तपासणी केली त्यात या सर्व जणांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने गावाने सुटकेचा निश्वास टाकला दरम्यान अजूनही संपर्कात असणारे इतर दोन वस्तीवर असणारांची पुन्हा कॅम्प लावून तपासणी करण्यात येणार आहे


 


 यावेळी मरळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी इंदिरा भिंगारदेवे, आरोग्य सेवक सी ए पाटील, आरोग्य सेविका श्रीमती एस डी मगरे, आरोग्य सेवक टी डी जाधव, प्रयोग शाळेचे निलेश सूर्यवंशी, आरोग्य सुपरवायझर पराडके, आरोग्य कर्मचारी एम ए कांबळे, एन टी नलवडे अर्धवेळ परिचर श्रीमती एस एस सुर्यवंशी, आशा श्रीमती डी ए गुरव ,श्रीमती व्ही टी सुर्यवंशी , सरपंच संजय थोरात व ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते