कराड नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये देशात प्रथम…सलग दुसऱ्या वर्षी प्रथम येण्याचा सन्मान


कराड नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये देशात प्रथम…सलग दुसऱ्या वर्षी प्रथम येण्याचा सन्मान


कराड : प्रतिनिधी 


स्वच्छ सर्वेक्षण 2020 स्पर्धेमध्ये कराड नगरपालिकेचा प्रथम क्रमांक आल्याची घोषणा केंद्रीय नगर विकासमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नवी दिल्ली येथे जाहीर केला आहे.


कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचे पारितोषिक वितरण व्हर्च्युअल पद्धतीने झाला आहे.


मुंबई येथे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, प्रधान सचिव महेश पाठक, प्रधान सचिव मनीषा म्हैसकर पाटणकर, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, तत्कालीन मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण 2020 चा निकाल 20 ऑगस्टला केंद्रीय नगर विकासमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी जाहीर केला. गेल्या वर्षी या स्पर्धेत कराड नगरपरिषदेने एक लाख लोकसंख्येच्या आतील शहरांमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवला होता.


2020 सालच्या स्पर्धेतही कराड नगरपरिषदेने देशात प्रथम क्रमांक मिळवला.


स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये एक लाख लोकसंख्येच्या आतील शहरांमध्ये महाराष्ट्राने बाजी मारली आहे देशात प्रथम क्रमांकावर असून सासवड दुसऱ्या क्रमांकावर तर लोणावळा नगरपरिषद तिसऱ्या क्रमांकावर आहे. एक लाखावरील लोकसंख्येच्या शहरात इंदूर (मध्य प्रदेश) महापालिकेने सलग चौथ्या वर्षी देशात प्रथम क्रमांक मिळवला. सुरत (गुजरात) या शहराने दुसरा तर नवी मुंबई (महाराष्ट्र) महापालिकेने तिसरा क्रमांक पटकावला आहे.