कोरोना संकटामुळे रविराज देसाई यांचा दि.12 ऑगस्ट रोजीचा वाढदिवस व वाढदिवसानिमित्तचे सर्व कार्यक्रम स्थगित वाढदिवसानिमित्त परगावी जाणार.


कोरोना संकटामुळे रविराज देसाई यांचा दि.12 ऑगस्ट रोजीचा वाढदिवस व वाढदिवसानिमित्तचे सर्व कार्यक्रम स्थगित वाढदिवसानिमित्त परगावी जाणार.


दौलतनगर दि.11: मोरणा शिक्षण संस्थेचे व पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्र मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई यांचा दि. १२ ऑगस्ट,२०२० रोजीचा वाढदिवस व वाढदिवसानिमित्त पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्र मंडळ व लोकनेते बाळासाहेब देसाई नागरी सह.पतसंस्था यांच्यावतीने आयोजीत करण्यात येणारे सर्व कार्यक्रम यंदाच्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे स्थगित करण्यात आले आहेत.कोरोना संकटामुळे यादिवशी ते परगांवी जाणार असून कुणीही प्रत्यक्ष न भेटता दुरध्वनीवरुन शुभेच्छा दयाव्यात अशी माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई नागरी सहकारी पतसंस्था व पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्रमंडळ यांच्यावतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे.


 पत्रकांत म्हंटले आहे की,मोरणा शिक्षण संस्थेचे व पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्र मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई यांचा दि. १२ ऑगस्ट रोजी प्रतिवर्षी वाढदिवस साजरा करण्यात येतो त्यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने सातारा याठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई नागरी सहकारी पतसंस्था व पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्रमंडळ यांच्यावतीने पाटण तालुक्यातील सातारा रहिवाशी असणाऱ्या इयत्ता 10 वी व 12 वी मधील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थीनींचा तसेच ज्या पालकांना वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहे त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात येतो.यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे रविराज देसाई यांचा दि. १२ ऑगस्ट, २०२० चा वाढदिवस व वाढदिवसानिमित्ताचे सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. कोरोनामुळे पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्रमंडळ व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून वाढदिवसादिवशी ते परगांवी जाणार असून कोरोनामुळे कुणीही प्रत्यक्ष न भेटता दुरध्वनीवरुन शुभेच्छा दयाव्यात असे रविराज देसाईंनी सांगितले असल्याचेही लोकनेते बाळासाहेब देसाई नागरी सहकारी पतसंस्था व पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्र मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.


Popular posts
बंडखोरांना इशारा ते राजीनाम्याची तयारी... उद्धव ठाकरेंच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे
इमेज
वा..वा..वा...प्रत्यक्षात भेटू त्यावेळी काढू फोटो... प्रवीणजी तरडे यांनी दिली स्वतःच्या चित्राला दाद
इमेज
कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स च्या विद्यार्थ्यांचे दहावी बोर्ड परीक्षेमध्ये घवघवीत यश
इमेज
ज्ञानाची शिदोरी’ उपक्रमात सहभागी होण्याचे ‘स्पंदन’ ट्रस्ट चे आवाहन
इमेज
काजारवाडी येथील वि.का.स. सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी सुभाष काजारी तर व्हा. चेअरमन पदी हणमंत जंगम यांची बिनविरोध निवड.
इमेज