पुणे जिल्हा व खड़कवासला विधानसभा शिवसेनेचे कर्नाटक सरकार विरोधात आंदोलन.


पुणे जिल्हा व खड़कवासला विधानसभा शिवसेनेचे कर्नाटक सरकार विरोधात आंदोलन.


 "छत्रपती शिवाजी महाराजांचा" पुतळा रातोरात हटवणाऱ्या कर्नाटक सरकारच्या हुकूमशाही विरोधात शिवसेनेचे तीव्र आंदोलन. 


 


पुणे /प्रतिनिधी 


कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी मणगुत्ती गावात अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिष्ठापना करण्यात आलेला पूतळा कर्नाटक सरकारच्या आदेशावरून पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आला होता. 


 तरी देखील याबाबत कर्नाटकात सत्ता असलेल्या भाजपाने या विरोधात ब्र शब्द सुद्धा  काढलेला नाही. 


या घटनेवरून पुन्हा एकदा भाजपाचे छत्रपती शिवाजी महारांविरोधात असलेली खोटी निष्ठा समोर आलेली आहे. 


          त्याचाच निषेध म्हणून शिवसेना जिल्हा व शिवसेना खड़कवासला विधानसभा मतदार संघाने शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश कोंडे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन केले, त्यावेळी "छत्रपती शिवाजी महाराज" कि जय, कर्नाटक सरकारचा निषेध असो, भाजपा सरकारचा निषेध असो अशा घोषणांनी परिसर गुंजुन गेला, यावेळी शिवेसेना महिला आघाडी यानी कर्नाटकाचे मुख्यमंत्री यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला  जोडो मारो आंदोलन करून भाजपा स्थित कर्नाटक सरकारचा निषेध करून आपली भावना व्यक्त केली.


                यावेळी पुणे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, विधानसभा प्रमुख नितीन वाघ, पुणे शहर समन्वयक भारत कुंभारकर, संतोष गोपाळ, विभागप्रमुख नीलेश गिरमे, हवेली उपतालुकाप्रमुख संतोष शेलार, शिवसैनिक शिवाभाऊ पासलकर, प्रभागप्रमुख राज पायगुडे महेश विटे, 


शाखाप्रमुख संतोष सावंत, रमेश देसाई, आकाश बालवडकर, महिला आघाडी पूजा रावेतकर, सरोज कार्वेकर, सुनीता खंडाळकर महिला पदाधिकारी, इतर शिवसैनिक व  प्रमुख पदाधिकारी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत उपस्थित होते.