संवेदनशील मनाचे साहेब....


संवेदनशील मनाचे साहेब....


 


वार - बुधवार दि.22 जुलै, 2020 रोजी


वेळ - सायंकाळी 6.35 वाजता


स्थळ: सागांव ता.पाटण


पाटणच्या घाटातून गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे लाल दिव्याच्या गाडीतून आगमन होते. नियोजित सांत्वनपर भेटीसाठी सागाव मध्ये ते येणार असतात.  सोशल डिस्टन्स ठेवून शासनाच्या नियमांचे पालन करत काही साहेबप्रेमी या वेळी उपस्थित असतात. आपला निष्ठावान कार्यकर्ता हरपल्यामुळे त्यांच्या कुटूंबियांना धीर देण्यासाठी साहेब त्या ठिकाणी आलेले असतात. थोडावेळ त्या कुटंबियांच्या घरी थांबल्यावर मा.नामदारसाहेब पुढील नियोजित कामासाठी निघतात. जमलेेल्या लोकांना नमस्कार करतात. इतक्या घाईतही कुणाच्या काही समस्या आहेत का याची आवर्जून विचारपूस करतात.


अशातच एक कार्यकर्ता साहेबांना म्हणतो, ‘‘साहेब आबांची तब्बेत बरी नाही.’’


त्यावर साहेब म्हणतात, ‘‘कुठे आहेत आता’.


 


कार्यकर्ता: ‘‘ घरी आहेत’’..


 


साहेब: चल, जावूया घरी.....


 


साहेबांच्या या अनपेक्षित उत्तराने कार्यकर्ता गोंधळून जातो. याचवेळी साहेब त्याला प्रेमाने दरडावतात. अरे आता सांगितलयस ना, मग बस की गाडीत. साहेब त्याला स्वतःच्या गाडीतून घेवून थेट त्याच्या ढेबेवाडीतील घरी जातात. तेथे आवर्जून त्यांच्या वडिलांच्या तब्बेतीची चैकशी करतात. आणि थेट पुढे निघून जातात.


खरंतर साहेबांची नियोजित कामे अनेक असतात. परंतू अशा आपुलकीच्या भेटीमुळे कार्यकर्ता, पदाधिकारी यांच्यामध्ये नवा उत्साह येतो. सध्या कोविड-19 च्या संसर्गामुळे नामदार शंभूराज देसाई संपूर्ण जिल्हयात पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. लोकांच्या समस्या जाणून घेवून त्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. वासीम जिल्हयाचे पालकमंत्री असलेले ना.शंभूराज देसाई वासीम जिल्हयातदेखील नेहमी संपर्क ठेवून असतात. नामदार साहेबांच्या या जनसंपर्काचे कौतुक करावेच लागेल.


केवळ तोंडदेखले विचारपूस करण्याऐवजी मनापासून आपल्या मतदारसंघात नेहमी कार्यरत असलेल्या गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या या कृतीची ढेबेवाडीत बराच काळ चर्चा रंगली होती.


लेखन: डाॅ.संदीप डाकवे