कुंभारगांव परिसरात रानडुकरांचा धुमाकूळ ऊस शेतीचे नुकसान


छाया : अनिल देसाई. ( कुंभारगांव ) 


कुंभारगाव परिसरात रानडुकरांचा धुमाकूळ ऊस शेतीचे नुकसान .


कुंभारगाव प्रतिनिधी (राजेंद्र पुजारी) 


कुंभारगांव ता पाटण येथील मान्याचीवाडी येथील ऊसाचे शेतात रानडुकरांचा धुमाकूळ. शेतकऱ्यांचे नुकसान. 


कुंभारगांव पासून जवळच असणाऱ्या मान्याचीवाडी येथील श्री राजेन्द्र माने, तानाजी कुसळ, सुभाष मोरे.(तळी शिवार) येथील शेतकऱ्यांच्या शेतात रानडुकराने ऊस शेतीचे नुकसान केले आहे. 


अगोदरच शेतकरी कोरोनाच्या संकटात कसा तरी जगत आहे असे असताना ऐन उन्हाळ्यात कमी पाण्यात ऊसाचे पिक शेतकर्‍यांनी कष्ट करून जगवले, आणि आता पावसाळा सुरू होताच चांगल्या आलेल्या ऊस शेतात रानडुकरानी धुमाकूळ घातला आहे पिकांचे नुकसान करण्यास सुरवात केली आहे. त्या मुळे शेतकरी वर्गात चिंता पसरली आहे. 


तरी वन विभागाने तातडीने नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी जोर धरू लागली आहे व रानडुकरांचा बंदोबस्त करावा ही शेतकऱ्यांची मागणी आहे.