चाळकेवाडी कुंभारगांव येथे कोरोना चा पुन्हा शिरकाव.


चाळकेवाडी कुंभारगांव येथे कोरोना चा पुन्हा शिरकाव.


कुंभारगांव/ प्रतिनिधी: कुंभारगांव तालुका पाटण येथे काल पुन्हा एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्हआढळला. या रुग्णाच्या निकट सहवासीत ९ जणांना तळमावले येथील विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. तर इतर संपर्कातील ६ जणांना होम क्वारंनटाइन केले आहे. प्रशासन व कोरोना कमिटी सतर्क झाली आहे. कोरोना बाधित रुग्ण ४ जुलै रोजी मुंबईहून आपल्या गावी चाळकेवाडी येथे आला होता. ग्राम कोरोना कमिटीने त्याला घरीच होम क्वारंनटाइन केले होते. परंतु काही दिवसांपूर्वी या रुग्णाला त्रास जाणवू लागल्याने कराड येथील एरम हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात केले होते. नुकताच या रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा या गावात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ही माहिती समजताच पाटणचे आरोग्याधिकारी डॉ. आर बी पाटील.तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश गोंजारी व त्यांच्या वैद्यकीय पथकातील  आरोग्य सेवक आर बी बोकरे, आरोग्य सहायक एस जीं मोहिते, व्ही जी फाळके यांनी तातडीने चाळकेवाडी या गावाात जाऊन  ग्रामस्थांना योग्य त्या सूचना दिल्या  व घरीच थांबून  काळजी घेण्याचे आवाहन केले. तर  ढेबेवाडी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तमराव भजनावळे यांनीही चाळकेवाडी येथे भेट देऊन कोरोना कमिटी व ग्रामस्थांना योग्य त्या सूचना दिल्या.


Popular posts
कोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय!
इमेज
तुकाराम गुरव यांचे दुःखद निधन
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.
इमेज
शैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.
इमेज