कुस्ती व कुस्ती मल्ला वर प्रेम करणारे व्यक्तिमत्व विकास आण्णा शिरसट. वाढदिवसाचा खर्च कुस्ती मल्लांच्या खुराकासाठी.


कुस्ती व कुस्ती मल्ला वर प्रेम करणारे व्यक्तिमत्व विकास आण्णा शिरसट. वाढदिवसाचा खर्च कुस्ती मल्लांच्या खुराकासाठी.


 


शिराळा: मेणी (शिरसटवाडी) ता.शिराळा येथील कुस्ती प्रेमी युवक विकास शिरसट यांनी वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन शेडगेवाडी येथील मल्लविद्या कुस्ती केंद्रातील मल्लांना दहा किलो तूप भेट दिले.


गेले चार महिने कोरोनामुळे बाहेर गावी असणारे कुस्ती मल्ल तालीम सोडून घरी परतले आहेत. या काळात शेडगेवाडी परिसरातील मल्ल अखंडपणे सराव करत आहेत. मात्र त्यांना कुस्त्या बंद झाल्याने आर्थिक चणचण भासत आहे. त्याचा परिणाम त्यांच्या खुराकावर होत आहे.अशा मल्लांना पाठबळ म्हणून आपल्या वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत विकास शिरसट यांनी दहा किलो तुपाचे वाटप केले..


यावेळी कुस्ती मल्लविद्या कोल्हापुर जिल्हा संघटक आनंदराव पाटील , महादेव वाघमारे , कुस्ती मल्लविद्या पैलवान सहाय्यता कक्ष प्रमुख पै.राहुल पाटील ,संदीप नाटूलकर उपस्थित होते.Popular posts
कोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय!
इमेज
तुकाराम गुरव यांचे दुःखद निधन
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.
इमेज
शैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.
इमेज