कोरोना ची साखळी तोडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करा: प्रफुल्ल जाधव


कोरोना ची साखळी तोडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करा: प्रफुल जाधव


पाटण, दि 24


शासकीय कार्यालयात विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांकडून स्वतःची व इतरांची काळजी घेण्याबाबत गंभीर्य राहिले नसल्यासारखे चित्र दिसत असून पाटण ता लुक्यासह तालुक्याबाहेरून आलेल्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने तहसील कार्यालय, पुरवठा शाखा आणि इतर विभागातील अधिकाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे पुरवठा शाखेतील कामासाठी प्रत्यक्ष कार्यालयात न येता ऑनलाईन अर्ज करावेत असे आवाहन या शाखेच्यावतीने करण्यात आले आहे


कोरोनाची साखळी आता वाढू लागली आहे ही साखळी तुटावी व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून लॉक डाउन घेण्यात आला आहे नुकताच कडक अंमलबजावणीचा पाच दिवसांचा कालावधी संपून पुढील पाच दिवस सकाळी 9 ते 2 फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत मात्र जनतेकडून केवळ कडक कारवाई होत असेल तरच नियम पाळण्याची भूमिका दिसते मात्र जरा शिथिलता मिळाली की मोकटपणे वावर करण्याची मानसिकता दिसून येते तोच प्रकार आता दिसू लागला आहे दरम्यान शासकीय कार्यालयात कामा निमित्त येणारांची संख्याही लॉक डाउन काळात जास्त वाढलेली दिसत आहे विशेषतः रेशनकार्ड संदर्भात असणाऱ्या कामासाठी लोक जास्त प्रमाणात येत आहेत लॉक डाउनमुळे अनेकजणचा गावाकडचा मुक्काम वाढला आहे तर रेशनकार्ड वर मिळणारे सवलतीचे धान्य हा प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचा विषय बनला आहे त्यामुळे रेशनकार्ड संदर्भात कामासाठी पुरवठा शाखेतील वर्दळ वाढली आहे त्यामध्ये या अगोदर वेळ मिळत नसल्याने सुट्टी नसल्याने ज्यांची कामे प्रलंबित होती अशा पुणे, मुंबई व इतर ठिकाणी राहणाऱ्या लोकांचा समावेश आहे सध्या वेळ मिळाला असला तरी कोरोनामुळे परिस्थिती किती गंभीर बनली आहे याचे भान ठेवणेही गरजेचे आहे हे सर्व जण विसरले आहेत पुरवठा शाखेत रेग्युलर धान्य, मोफत धान्य यामुळे नेहमीच्या कामामुळे लोकांना यावे लागते त्यामुळे गर्दी असतेच त्यातच किरकोळ कामासाठी देखील येणारांची संख्या वाढून त्यांचा सर्वत्र वावर वाढल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे त्यामुळे जनतेने प्रत्यक्ष गर्दी न करता ऑनलाईन अर्ज करण्याची गरज आहे


पुरवठा शाखेतील लोकांचा वाढलेला वावर धोक्याची घंटा वाजवणारा असून त्यामध्ये परगावाहून आलेल्यांची संख्या जास्त आहे त्यामुळे पुरवठा शाखेचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी किरकोळ कामासाठी व महत्वाच्या कामासाठी गर्दी करणारांनी 31 जुलै अखेर tahsilpatan@gmail.com वर आपले अर्ज करून गर्दी टाळण्यासाठी सहकार्य करावे व कोरोना साखळी तोडण्यास आपले योगदान द्यावे असे आवाहन पुरवठा निरीक्षक प्रफुल्ल जाधव व अव्वल कारकून महादेव अष्टेकर यांनी केले आहे